गंगाजमुना पेटले; राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमोर ठाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 01:16 PM2021-08-22T13:16:43+5:302021-08-22T13:19:55+5:30

Nagpur News Ganga Jamuna Red light Area विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जात असलेल्या गंगाजमुना या वसाहतीला हटवण्याचे पोलिसी प्रयत्न व त्याला वाचवण्याचे कार्यकर्त्यांचे आंदोलन रविवारी चांगलेच पेटले.

Gangajamuna issue ; Two women NCP leaders confronted each other | गंगाजमुना पेटले; राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमोर ठाकल्या

गंगाजमुना पेटले; राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमोर ठाकल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जात असलेल्या गंगाजमुना या वसाहतीला हटवण्याचे पोलिसी प्रयत्न व त्याला वाचवण्याचे कार्यकर्त्यांचे आंदोलन रविवारी चांगलेच पेटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या या रणात एकमेकींच्या विरोधात उतरल्याचे दिसले. वारांगनांची ही वस्ती वाचवण्यासाठी कंबर कसलेल्या गंगाजमुना बचाव समितीच्या ज्वाला धोटे आणि नगरसेविका आभा पांडे यांनी एकमेकांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. एकीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर दुसरीकडे बचाव व हटाव गटांची कारवाई यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यात ज्वाला धोटे या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत तर आभा पांडे पक्षातर्फे नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. (Gangajamuna issue) (Jwala Dhote and Abha Pandey)


काय आहे संघर्ष?
गेल्या ९ आॅगस्टपासून गंगाजमुना ही वस्ती हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. येथील अवैध धंदे, दारुची दुकाने, कोरोनाच्या प्रार्दुर्भावाची शक्यता आणि गुन्हेगारीला असलेले पोषक वातावरण दूर करण्यासाठी ही कारवाई असल्याचे सांगितले गेले होते. या भागातील सेक्स वर्कसच्या पुनर्वसनाची कुठलीही योजना जाहीर न करताच शासनाने हा निर्णय घेतला असून, या महिलांना येथून हटवू देणार नाही, अशी भूमिका गंगाजमुना बचाव समितीने घेतली आहे. समितीच्या प्रमुख ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आधी पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे नगरसेविका आभा पांडे यांनी या वस्तीला हटवण्यासाठी जोर एकवटला आहे.


सुमारे दहा एकरात पसरलेली व कोटयवधी रुपये किंमतीची ही वस्ती इतवारी या घाऊक बाजाराला लागूनच असल्याने या बाजाराचा विस्तार करण्यासाठी तिच्यावर अनेक बिल्डर्सचा डोळा असल्याचीही चर्चा जोरात आहे.

Web Title: Gangajamuna issue ; Two women NCP leaders confronted each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.