गंटावार यांच्या अडचणीत वाढ : चार्जशीट दाखल करण्यास आयुक्तांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 10:53 PM2021-03-19T22:53:24+5:302021-03-19T22:55:55+5:30
Gantawar's difficulty increases मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंजुरी दिली आहे. यासोबतच डॉ. गंटावार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंजुरी दिली आहे. यासोबतच डॉ. गंटावार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गुन्हे शाखेच्या डीसीपींनी १० मार्च रोजी डॉ. गंटावार यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती. मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे चार्जशीट दाखल करण्यास मंजुरी देण्यासंदर्भातील प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. परंतु आज महापौरांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. महापौरांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला, तरी महापौरांनी सावधगिरी बाळगत सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
हनीट्रॅप प्रकरणात सय्यद साहिल याच्यासह गंटावार यांना सहआरोपी बनविण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध तहसील व मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मनपा सभागृहात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गंटावार यांच्या एकूण कारनाम्यांचा मुद्दा उपस्थित करीत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना अजूनपर्यंत निलंबित करण्यात आले नव्हते. चार्जशीट दाखल होताच गंटावार यांच्या अडचणीत वाढ होईल.