राष्ट्रीय महामार्गालगत कचरा संकलनाची साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:54+5:302021-05-26T04:09:54+5:30
कन्हान : शहराच्या मध्य भागातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. शहरातील कचरा संकलन सुकर व्हावे म्हणून स्थानिक नगर परिषद ...
कन्हान : शहराच्या मध्य भागातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. शहरातील कचरा संकलन सुकर व्हावे म्हणून स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या राष्ट्रीय महामार्गालगत प्रत्येकी १०० मीटर अंतरावर कचराकुंड्या ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांनी दिली.
या महामार्गालगत पहिल्या दिवशी २० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. या कचराकुंड्या आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. ओला व सुकलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करता यावे म्हणून प्रत्येक ठिकाणी निळ्या व हिरव्या रंगाच्या कचऱ्याकुंड्यांची जाेडी ठेवली जात आहे. यावेळी नगराध्यक्ष करुणा आष्टनकर, नगरसेवक राजेश यादव, राजू शेंद्रे, नगरसेविका रेखा टोहणे, स्वच्छता अभियंता फिरोज बिसेन आदी उपस्थित होते.
===Photopath===
250521\img_20210525_184510.jpg
===Caption===
कन्हान न प मध्ये सुका व ओला वर्गीकृत कचरा कुंडया