अर्ध्या नागपूर शहरात कचरा संकलन ठप्प : सूचना न देता पुकारला संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:57 PM2020-06-01T23:57:43+5:302020-06-02T00:00:49+5:30

कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही.

Garbage collection halted in Nagpur city: Strike called without giving notice | अर्ध्या नागपूर शहरात कचरा संकलन ठप्प : सूचना न देता पुकारला संप

अर्ध्या नागपूर शहरात कचरा संकलन ठप्प : सूचना न देता पुकारला संप

googlenewsNext
ठळक मुद्देकामाच्या दिवसांमुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही.
बीव्हीजीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आम्हाला २६ दिवस काम देण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु लॉकडाऊनमुळे काम नसल्याने कर्मचाºयांना २० ते २२ दिवसांचे काम देण्यात येत होते. संबंधीत प्रकरणात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु सफाई कर्मचारी आपल्या मागण्यांवर अडून बसले आहेत. विशेष बाब म्हणजे कचरा संकलनाला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यावश्यक सेवेच्या श्रेणीत ठेवले आहे. सोमवारी आंदोलन करण्यापुर्वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा सूचना प्रशासनाला दिली नाही. त्यांनी अचानक काम बंद केले. अशा स्थितीत अ‍ॅपिडॅमिक अ‍ॅक्टनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कठोर पाऊल उचलल्या जाऊ शकते. कामगार आयुक्तांकडे हे प्रकरण जाणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीव्हीजी कंपनीत ९५६ कर्मचारी कार्यरत आहेत. वरिष्ठ कर्मचाऱ्यांना २६ दिवसांच्या जागी २२ ते २४ दिवसांचे काम आणि नव्या कर्मचाऱ्यांना २० ते २२ दिवसांचे काम देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. कंपनीचे अमोल माने यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे काम कमी झाले आहे. त्यामुळे कामाच्या दिवसात कपात करण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेऊन कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. कोणतीच सूचना न देता कर्मचारी संपावर गेले आहेत. कचरा संकलन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्देशानंतर पुढील पाऊल उचलण्यात येईल.

Web Title: Garbage collection halted in Nagpur city: Strike called without giving notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.