नागपुरात थीम पार्कच्या धर्तीवर बगिच्यांचा होतोय विकास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 08:15 PM2020-02-29T20:15:04+5:302020-02-29T20:22:04+5:30

नागपूर शहरातील बगिच्यांचा आता थीम पार्कच्या आधारावर विकास होत आहे. शहरातील महत्त्वाचे बगिचे आता वेगवेगळ्या थीमवर आधारित राहणार आहेत. महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

Gardens are being developed on the theme park in Nagpur | नागपुरात थीम पार्कच्या धर्तीवर बगिच्यांचा होतोय विकास 

नागपुरात थीम पार्कच्या धर्तीवर बगिच्यांचा होतोय विकास 

Next
ठळक मुद्दे बटरफ्लाय, फ्रॅगनन्स, रोझ गार्डनची थीम : महापालिकेचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील बगिच्यांचा आता थीम पार्कच्या आधारावर विकास होत आहे. शहरातील महत्त्वाचे बगिचे आता वेगवेगळ्या थीमवर आधारित राहणार आहेत. महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
उद्यान नागरिकांसाठी आवश्यक आहे. जनसंवाद कार्यक्रमात नागिरकांनी महापौर संदीप जोशी यांच्याकडे केलेल्या तक्रारींची दखल घेत उद्यानातील स्वच्छतागृहे, ग्रीन जीम, विद्युत दिवे आदींची योग्य देखभाल दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीसुद्धा या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे निर्देश दिले आहेत.
पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानाला बटरफ्लाय गार्डन म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या उद्यानात लेटिना, मोगरा, सूर्यफूल, गुलाब फूल फुलपाखरांना आमंत्रित करतील. झाडे आणि रोपट्यांनाही फुलपाखरांच्या स्वरूपात तयार करण्यात येत आहे. हनुमाननगरातील महात्मा गांधी उद्यानाला फ्रॅगनन्स थीमवर आधारित तयार केले जाणार आहे. या ठिकाणी मधुमालती, पारिजात, मोगरा, कुंदा, जाई, रातराणी, सोनचाफा यासारखी सुंगधी फुलझाडे लावण्यात आली आहेत. या झाडांचा सुगंध तेथे येणाऱ्यानागरिकांना मोहून टाकणार आहे.
नंदनवन येथील त्रिशताब्दी उद्यानात विविध प्रकारची फुले लावून तेथील वातावरण प्रसन्न आणि सुगंधित करण्यात येणार आहे. भारतमाता-डॉ. आंबेडकर उद्यान रोझ गार्डन म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
कळमना रोड शांतीनगरला लागून असलेल्या नामदेव नगर या दोन एकर परिसरात पसरलेल्या उद्यानात नव्याने फुलझाडांची रचना करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला टिकोमच्या १०-१२ फूट उंचीच्या झाडांना भरगच्च पिवळी फुले लागली आहेत. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार लवकरच या उद्यानातील तिन्ही बाजूला आपट्यांची गुलाबी रंगाची फुले असणारी झाडे लावून उद्यानाच्या सौंदर्यात भर घालण्यात येणार आहे. उद्यानातील विहिरीवरच कारंजे लावण्यात आले असून व्यावसायिक लॉनला लाजवेल इतका सुंदर तेथील लॉन साकारण्यात आला आहे.

जागृती कॉलनी उद्यानाचा उत्तम विकास
 काटोल रोडवर अमृत योजनेअंतर्गत दीड एकर परिसरात सन २०१८-१९ मध्ये जागृती कॉलनी उद्यान साकारण्यात आले. शबरी व इतर फुलझाडांची रचना या उद्यानात करण्यात आली आहे. वर्षभरातच या उद्यानाचा उत्तम विकास झाला. या उद्यानात नागरिकांकरिता बाबूंचे योगा शेड, मुलांकरिता खेळणी, मोठ्यांकरिता ग्रीन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. कधी काळी गडरचे पाणी जमा होत असलेल्या या जागेवर आता सुंदर उद्यान साकारल्याने नागरिकांना सोयीचे झाले आहे.

दयानंद पार्क होणार अ‍ॅडव्हेन्चर पार्क
 उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरातील दयानंद पार्क अ‍ॅडव्हेन्चर पार्क म्हणून विकसित होत आहे. त्यादृष्टीने तेथे वेगाने कार्य सुरू आहे.स्काय वॉक, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, सुंदर लॉन, बदाम आणि बकुळची झाडे ही दयानंद पार्कमधील इतर काही वैशिष्ट्ये राहणार आहेत.

Web Title: Gardens are being developed on the theme park in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.