गारमेंट व्यापाऱ्याला लावला २२.५० लाखांना चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:23+5:302021-09-24T04:10:23+5:30
नागपूर : गारमेंट व्यापा-याला त्याच्याच कर्मचाऱ्यांनी साथीदारांच्या मदतीने २२.५० लाखांना चुना लावल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज ...
नागपूर : गारमेंट व्यापा-याला त्याच्याच कर्मचाऱ्यांनी साथीदारांच्या मदतीने २२.५० लाखांना चुना लावल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज प्रकाश देवघरे (२८), आशिष ऊर्फ नागेश पराते (२७), रा. लालगंज फॅशन आउटफीट, कोराडी, ए.डी. कलेक्शन अहेरी आणि दिनेश साठे चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. जरीपटका येथील रहिवासी कमलेश रावलानी यांच्या इतवारीच्या तीन नल चौकात हिंदुस्थान गारमेंट आहे. मनोज आणि आशिष त्यांच्या दुकानात काम करतात. रावलानी यांनी १० ऑगस्ट २०१९ ला गांधीसागरच्या रजवाडा पॅलेसमध्ये गारमेंट फेअर लावला होता. या फेअरची जबाबदारी मनोज आणि आशिषला दिली होती. रावलानी यांनी २०१८ ते २०२१ दरम्यान हिशेब तपासला असता मनोज आणि आशिषने २२.५० लाखांची अफरातफर केल्याचे समजले. दोघांनी रावलानी यांच्या फर्मचा माल तीन गारमेंट दुकानांना विकला. ही रक्कम त्यांनी आपल्या खात्यात वळती केली. रावलानी यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
..............