३६,५०० ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी
By Admin | Published: October 3, 2015 02:36 AM2015-10-03T02:36:53+5:302015-10-03T02:36:53+5:30
केंद्र सरकारने गॅसची सबसिडी सोडण्याबाबत सुरू केलेल्या ‘गिव्ह इट अप’ मोहिमेला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
५ टक्के नागपूरकरांचा समावेश : देशभरात फक्त दोन टक्के
मुस्तफा मुनीर नागपूर
केंद्र सरकारने गॅसची सबसिडी सोडण्याबाबत सुरू केलेल्या ‘गिव्ह इट अप’ मोहिमेला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर जेमतेम २ टक्के ग्राहकांनी गॅस सबसिडी सोडली असताना नागपुरात मात्र ५ टक्के लोकांनी सबसिडी नाकारली आहे. उपराजधानीसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार देशात भारत गॅस, इण्डेन गॅस व एचपी गॅसचे सुमारे १५ कोटी ३० लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना एलपीजी सिलेंडरवर सुमारे ४० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली जाते. २७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तींनी एलपीजीवरील सबसिडी सोडावी, असे आवाहन केले होेते. प्राप्त आकडेवारीनुसार २ आॅक्टोबरपर्यंत देशभरातील ३१ लाख २३ हजार १३० ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. ही संख्या एकूण ग्राहकांच्या दोन टक्के आहे.
नागपूर शहरात भारत गॅस, इण्डेन गॅस व एचपी गॅसचे सुमारे साडेसात लाख ग्राहक आहेत. यापैकी सुमारे ३६ हजार ५०० ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. ही संख्या एकूण ग्राहकांच्या पाच टक्के आहे. बीपीसीएलचे विक्री व्यवस्थापक अजय भगत यांनी सांगितले की, नागपूर शहरात भारत गॅसचे सुमारे २ लाख ४१ हजार ग्राहक आहेत. यापैकी सुमारे १४ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. सबसिडी सोडणाऱ्यांमध्ये विदर्भातील भारत गॅसच्या ग्राहकांची संख्या २३ हजार ४०० आहे. आयओसीचे विक्री व्यवस्थापक अर्नब सेनगुप्ता यांनी सांगितले की, नागपूर शहरात इण्डेन गॅसचे २ लाख ७० हजार ग्राहक आहेत. यापैकी १३ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. एचपीसीएलचे अमिताभ गर्ग यांनी सांगितले की, नागपूर शहरात एचपी गॅसच्या सुमारे साडेनऊ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे.
अशी सोडता येईल सबसिडी
आपल्याला सबसिडी सोडायची असेल तर ट८छस्रॅ.्रल्ल वर लॉग इन करा. याशिवाय एचपी गॅस ग्राहक ९७६६८९९८९९ या क्रमांकावर, इण्डेन गॅस ग्राहक ८१३०७९२८९९ व भारत गॅस ग्राहक ७७३८२९९८९९ या क्रमांकावर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ‘गिव्ह इट अप’चा एसएमएस करू शकतात.