पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामान्यांना फटका

By admin | Published: May 18, 2015 02:30 AM2015-05-18T02:30:13+5:302015-05-18T02:30:13+5:30

युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे प्रमाण सुरूच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.

Gasoline and diesel hailstorm hurt | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामान्यांना फटका

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामान्यांना फटका

Next

आनंद शर्मा  नागपूर
युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे प्रमाण सुरूच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. परंतु केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास सुरुवात झाली. परंतु वर्ष २०१५ चा शुभारंभ होताच पेट्रोल-डिझेल पुन्हा जुन्याच दरावर येताना दिसत आहेत.
पेट्रोलियम पदार्थाच्या दरात बरीच वाढ झाली आहे. परंतु १ एप्रिल २०१४ च्या तुलनेत दर आताही कमीच आहेत. मात्र, महागाईची स्थिती अशीच कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे दर मागील दरापेक्षा अधिक होण्यास उशीर लागणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे त्यांना त्याची सवय पडली होती. विशेष म्हणजे आयएसआयएसच्या दहशतीमुळे खाडी देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत होते. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत होता. भारतीय तेल कंपन्याही दर कमी करत होत्या. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तेल कंपन्यांसमोर दर वाढविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Gasoline and diesel hailstorm hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.