गॅस्ट्रोचा सावरगावला स्ट्रोक!
By admin | Published: July 19, 2016 02:47 AM2016-07-19T02:47:49+5:302016-07-19T02:47:49+5:30
राज्यात वर्षभरात गॅस्ट्रोचे जेवढे रुग्ण आढळून येत नाही तेवढे रुग्ण एकट्या नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे आढळून
नागपूर : राज्यात वर्षभरात गॅस्ट्रोचे जेवढे रुग्ण आढळून येत नाही तेवढे रुग्ण एकट्या नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे आढळून आले. ११ ते १७ जुलैदरम्यान तब्बल ७६९ रुग्णांनी उपचार घेतले. यातील २५० रुग्णांना इस्पितळता भरती करून उपचार करण्यात आले. यातील दोघांचा मृत्यू झाला. आजही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना नागपुरात सोमवारी आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक व संचालक डॉ. मोहन जाधव उपस्थित असताना त्यांनी सावरगावाला भेट दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. वीज आणि पाणी यांचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून शुल्क आकारले जाते. परंतु सावरगावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचा फटका शेकडो लोकांना बसला. ११ जुलैपासून सावरगावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गॅस्ट्रोचे रुग्ण यायला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २६ रुग्ण आले होते. परंतु १२ आणि १३ तारखेला अचानक रुग्णांची संख्या वाढली.
४सोमवारी २३ रुग्ण आढळून आले असून, यातील आठ रुग्णांना भरती केले असल्याची माहिती आहे.
४सावरगावात सात दिवसांत गॅस्ट्रोसारख्या आजाराने थैमान घातले असताना व या आजाराची आजही दहशत असताना राज्याच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नाही.
४विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने एका प्रकरणात आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक व संचालक डॉ. मोहन जाधव यांना समन्स बजावल्याने हे दोन्ही अधिकारी सोमवारी नागपुरात होते. परंतु ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगावकडे या अधिकाऱ्यांंनीही पाठ दाखविली.
सावरगावला जाता आले नाही
आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मोहन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दुपारी ४.३० वाजता न्यायालयाचे कामकाज संपले. त्यावेळी सावरगावला जाऊन उद्याच्या मुंबईच्या बैठकांना उपस्थित राहणे हे शक्य नव्हते. यामुळे सावरगावला जाता आले नाही.