नागपूर जिल्ह्यातील  नांद-वडगाव धरणातील गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 09:53 PM2018-07-06T21:53:13+5:302018-07-06T22:39:08+5:30

मुसळधार पावसामुळे धरणही भरले. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उमरेड तालुक्यातील नांद आणि वडगाव धरणातील गेट उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासकांनी कळविले आहे.

Gate opened in Nand-Wadgaon dam in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील  नांद-वडगाव धरणातील गेट उघडले

नागपूर जिल्ह्यातील  नांद-वडगाव धरणातील गेट उघडले

googlenewsNext
ठळक मुद्देनदीकाठावरील गावांना सतर्कतेच इशारा : सुरक्षित जागी स्थलांतर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे धरणही भरले. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उमरेड तालुक्यातील नांद आणि वडगाव धरणातील गेट उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासकांनी कळविले आहे.
नांद धरणात सकाळी ८ वाजता २२ टक्के पाणीसाठा होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो ८८टक्क्यावर पोहोचला. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणातील ७ पैकी ६ गेट उघडण्यात आले. सध्याचा येवा ८०० दलघमी इतका असून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग ५६० दलघमी आहे तर वडगाव धरणात सकाळी ८ वाजता २२ टक्के साठा होता. तो सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८९ टक्केवर पोहोचला. या धरणातील २१ पैकी १७ गेट उघडण्यात आले. या धरणातील सध्याचा येवा ३०१७.७५ दलघमी असून सध्या नदीपात्रात येणारा विसर्ग ७८० दलघमी आहे. तरी दोन्ही नदी काठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Gate opened in Nand-Wadgaon dam in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.