नागपूर शहरात निनादले गीतरामायणचे सूर :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तीमय सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 09:08 PM2019-04-06T21:08:58+5:302019-04-06T21:13:15+5:30

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरांनी हिंदू नववर्षाच्या सकाळी भक्तीचा उत्साह लोकांमध्ये भरला. निमित्त होते संस्कार भारतीतर्फे गीतरामायणाच्या संगीतमय आयोजनाचे.

Geetaramayana's tune alarmed in the city: a devotional start on the festivities of Gudhi Padva | नागपूर शहरात निनादले गीतरामायणचे सूर :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तीमय सुरुवात

नागपूर शहरात निनादले गीतरामायणचे सूर :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तीमय सुरुवात

Next
ठळक मुद्देसंस्कार भारतीतर्फे विदर्भात संगीतमय महायज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरांनी हिंदू नववर्षाच्या सकाळी भक्तीचा उत्साह लोकांमध्ये भरला. निमित्त होते संस्कार भारतीतर्फे गीतरामायणाच्या संगीतमय आयोजनाचे.
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या साधनेने अजरामर झालेले ‘गीतरामायण’ म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विदर्भाच्या घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न संस्कार भारतीने चालविला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी यादरम्यान विदर्भात १५१ ठिकाणी संगीतमय गीतरामायणचे आयोजन केले जात आहे. शनिवारी शहरात सहा ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करून या महायज्ञाला सुरुवात झाली. या महायज्ञाचे औपचारिक उद्घाटन पावनभूमी, सोमलवाडा येथील बास्केटबॉल मैदानावर झाले. स्थानिक हनुमान सेवा मंडळाच्या सहकार्याने येथे हा कार्यक्रम झाला. सूरमणी प्रभाकर धाकडे गुरुजी यांच्याहस्ते या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, संस्कार भारतीच्या कांचन गडकरी, हनुमान सेवा मंडळाचे लक्ष्मणराव देशपांडे, महायज्ञाचे संयोजक गजानन रानडे, चंद्रकांत घरोटे, मनोज श्रुती, प्रसाद पोफळी, प्रवीण योगी, विवेक जुगादे, प्रकाश देवाळकर, दिनेश वंजारी, मोहन पारखी, समीर देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
हिंदू नववर्षाचा दिवस असल्याने पारंपरिक वेषात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष एकमेकांना शुभेच्छा देत होते. औपचारिक उद्घाटनानंतर कलावंतांनी गीतरामायणला सुरुवात केली. ‘कुशलव रामायण गाती..., दशरथा घे हे पायसदान..., राम जन्मला ग..., रामा चरण तुझे लागले..., स्वयंवर झाले सीतेचे..., निरोप कसला माझा घेता..., पराधीन आहे जगती..., सेतू बांधा रे..., गा बाळांनो श्री रामायण...’ अशा गीतरामायणमधल्या भक्तीमय रचना कलावंतांनी सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. संगीत संयोजक व गायक अमर कुळकर्णी, शशांक दंडे, रसिका बावडेकर, अमेय वैद्य, स्वप्निल हरदास, फाल्गुनी खाटीक या गायक कलावंतांसह आनंद मास्टे (किबोर्ड), प्रफुल्ल माटेगावकर (हार्मोनियम), मोरेश्वर दहासहस्र व राम ढोक (तबला) यांचा सहभाग होता. निवेदन सोनाली अडावदकर यांनी केले. यादरम्यान म्हाळगीनगर, राम मंदिर, रामनगर, तपस्या विद्यालय टी-पॉईंट मानेवाडा रिंग रोड, रवींद्रनगर, पाचलेगावकर महाराज मठ, चिंचभुवन, धंतोली उद्यान, त्रिमूर्तीनगर हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, जुना बाबुळखेडा या ठिकाणीही गीतरामायणाचे भक्तीस्वर निनादले. ७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता नाईक तलाव बांगलादेश येथे तर बेलतरोडी, केशवनगर विद्यालय जगनाडे चौक, जयप्रकाशनगर, नरेंद्रनगर, लक्ष्मीनगर, लाकडीपूल महाल, स्नेहनगर, भरतनगर, पांडे ले-आऊट, सुभाषनगर, रमना मारोती दिघोरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
महारांगोळीने वेधले लक्ष
सोमलवाड्याच्या बास्केटबॉल मैदानावर हिंदू नववर्षाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या २०० कलावंतांनी ४००० चौ.फुटात रेखाटलेल्या महारांगोळीचे लोकार्पण यावेळी झाले. महारांगोळीची संकल्पना व आरेखन रोहिणी घरोटे, मोहिनी माकोडे, श्रीकांत बंगाले यांनी केले आहे. मतदार जागृती ही रांगोळीची मध्यवर्ती कल्पना आहे. ही महारांगोळी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होती. येणारा प्रत्येकजण ही रांगोळी न्याहाळत सेल्फीमध्ये कैद करीत होता. याशिवाय राजीव चौधरी व सहकाऱ्यांद्वारे ५०० चौ.फूट कॅनव्हासवर गीतरामायणाची गाणी  कॅलिग्राफीवर आरेखित केली जातील.
 १५१ ठिकाणी आयोजन
पश्चिम विदर्भात अमरावती येथूनही शनिवारी गीतरामायणाच्या संगीतमय आयोजनाचा शुभारंभ झाला. संस्कार भारतीतर्फे नागपुरात ५२ ठिकाणी तर संपूर्ण विदर्भात १५१ ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. १३ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या महायज्ञात विदर्भातील प्रथितयश आणि नवोदित अशा १००० गायक, वादक व नर्तक कलावंतांचा सहभाग राहणार आहे.

Web Title: Geetaramayana's tune alarmed in the city: a devotional start on the festivities of Gudhi Padva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.