नागपुरात ‘कोरोना’वर गाजणार महासभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:09 AM2020-06-15T11:09:54+5:302020-06-15T11:10:29+5:30

नागपुरात २० जूनला होणारी मनपाची सर्वसाधारण सभा ‘कोरोना’वर गाजणार असल्याचे संकेत आहेत.

General Assembly to be held on 'Corona' in Nagpur! | नागपुरात ‘कोरोना’वर गाजणार महासभा!

नागपुरात ‘कोरोना’वर गाजणार महासभा!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्र व क्वारंटाईन केंद्रांवरील गैरसोयींबाबत जाब विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताळल्याने संसर्ग आटोक्यात ठेवल्याचा मनपा प्रशासनाचा दावा आहे. तर प्रशासनाने पदधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व क्वारंटाईन सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी, अशा मुद्यावरून प्रशासनाला जाब विचारण्याची नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे.
यामुळे २० जूनला होणारी मनपाची सर्वसाधारण सभा ‘कोरोना’वर गाजणार असल्याचे संकेत आहेत.
तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मनपा प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. मोमिनपुरा येथील कत्तलखाना सुरू असल्याने संसर्ग वाढल्याचा दावा आरोग्य विभागातील अधिकाºयांनी केला होता. तर मनपा प्रशासनाच्याच परवानगीने हा कत्तलखाना सुरू असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. कोरोनासंदर्भात नोटीस बजावली असून ती कामकाजात समाविष्ट करण्यात आली आहे.
क्वारंटाईन सेंटरवरील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. कोरोनाची लागण झालेले आणि न झालेल्यांना एकाच ठिकाणी ठेवले गेले. सामूहिक शौचालयामुळे संसर्गाचा निर्माण झालेला धोका, सुरुवातीला अन्नात अळ्या निघाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.
यामुळे मनपाची झालेली बदनामी, मनपा आयुक्त हे कुणाचेही ऐकत नाहीत, निर्णय प्रक्रियेत पदाधिकाºयांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषदेतून दिला होता. याचे पडसाद सर्वसाधारण सभेत दिसणार आहेत. तसेच शहरातील कचरा संकलन, रखडलेली विकास कामे, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन व नियुक्ती अशा मुद्यावरून नगरसेवक आक्रमक आहेत.

भट सभागृहात प्रथमच महासभा
कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून महापालिकेची एकही सर्वसाधारण सभा झाली नाही. नियमानुसार प्रत्येक महिन्यात एक सभा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून चित्र सर्वसामान्य होत आहे. तरी सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे प्रथमच कविवर्य सुरेश भट सभागृहात महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. महापालिकच्या महाल स्थित टाऊन हॉलमध्ये ही सभा होत असते.

वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार
शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने अस्ताव्यस्त अशी वाहने उभी करण्यात येतात. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी महापालिकेने मे. यू.एम.टी.सी., हैदराबाद येथील कंपनीला शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करून पार्किंग व्यवस्थापनेचा आराखडा सादर करण्यास सागितले होते. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Web Title: General Assembly to be held on 'Corona' in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.