गांधीबाग सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा यशस्वीतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:18+5:302021-04-06T04:07:18+5:30
ग्राहकांना अधिकाधिक कार्यक्षम व उच्च दर्जाची सेवा देण्याकरिता एटीएम, डेबिट कार्ड व ई-कॉमर्स सेवा सुरू करण्यात आली आहे. डिजिटल ...
ग्राहकांना अधिकाधिक कार्यक्षम व उच्च दर्जाची सेवा देण्याकरिता एटीएम, डेबिट कार्ड व ई-कॉमर्स सेवा सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी यापुढे बँकेचा कॅशलेस व पेपरलेस व्यवहारावर जास्तीतजास्त भर राहणार आहे असे दुरगकर यांनी यावेळी सांगितले. तसेच, त्यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. २०१९-२० या वर्षात बँकेला अंकेक्षण वर्ग-अ प्राप्त झाला आहे. बँकेचा सीआरएआर १३.४५ टक्के आहे. बँकेच्या वसूल भागभांडवलामध्ये ३०.१८ लाख, कर्ज व्यवहारामध्ये १२०३.२५ लाख व खेळते भागभांडवलामध्ये २२७.९४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. वाढीचे प्रमाण अनुक्रमे ४.४९, ७.४३ व ०.८२ टक्के आहे असे दुरगकर यांनी सांगितले. सभेत उपाध्यक्ष प्रल्हाद गावंडे, संचालक डॉ. सुभाषचंद्र बजाज, रतनलाल लाहोटी, अरुण टिकले, विवेकराव नागुलवार, विठ्ठलराव नारनवरे, संकेत दुरगकर, मीनाक्षी ठाकरे, आदी उपस्थित होते.