नागपूर जि.प.ची सर्वसाधारण सभा २४ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:19 PM2020-07-04T20:19:49+5:302020-07-04T20:21:29+5:30
सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर जिल्हा परिषदेने सभेसाठी महापालिकेच्या सुरेश भट सभागृहाची मागणी केली होती. परंतु महापालिकेने सभागृह देण्यास नकार दिला. दरम्यान, देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी जि.प.ने दर्शविली, मात्र तिथेही अडचण निर्माण झाली. त्यामुळे वनामतीचे सभागृह निश्चित करण्यात आले. वनामती सभागृहासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २१ जुलै ही तारीख दिली होती. परंतु आवश्यक सर्व व्यवस्था करण्यासाठी वेळ लागणार असल्याने अध्यक्ष बर्वे यांनी २४ तारखेला सभा घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली.
आमची प्राथमिकता भट सभागृहात सभा घेण्याची होती. सीईओ योगेश कुंभेजकर हे मनपा आयुक्तांसोबत बोललेही होते. त्यांनी सुरवातीला होकार दर्शविला, नंतर मात्र सभागृह देण्यास नकार दिला. परंतु त्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. भविष्यात आम्हीही महापालिकेला सहकार्य करावे याबाबत विचार करू.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प., नागपूर