महामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:39 AM2018-05-27T00:39:53+5:302018-05-27T00:41:17+5:30

अवघ्या सव्वाचार महिन्यांच्या अल्पावधीत सेगमेंट बनविण्याचे विक्रमी कार्य मेट्रोने पूर्ण केले आहे. सेगमेंट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मेट्रोने गाठला आहे. मागील १५ महिन्यांत २२६५ सेगमेंट तयार करण्यात आले असून यापैकी १००० सेगमेंट अवघ्या १३२ दिवसात (सव्वाचार महिने) तयार करण्यात आले असून निर्मितीचा विक्रम केला आहे.

Generation of 1000 segments in short time by Mahametro | महामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती

महामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती

Next
ठळक मुद्देनिर्मितीचा विक्रम : सेगमेंट बसविल्यानंतर रुळाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अवघ्या सव्वाचार महिन्यांच्या अल्पावधीत सेगमेंट बनविण्याचे विक्रमी कार्य मेट्रोने पूर्ण केले आहे. सेगमेंट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मेट्रोने गाठला आहे. मागील १५ महिन्यांत २२६५ सेगमेंट तयार करण्यात आले असून यापैकी १००० सेगमेंट अवघ्या १३२ दिवसात (सव्वाचार महिने) तयार करण्यात आले असून निर्मितीचा विक्रम केला आहे.
याशिवाय ११६ आय-गर्डरदेखील या कालावधीत तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण होणार आहे. हिंगणा येथील २५ एकर क्षेत्रफळ असलेल्या कास्टिंग यार्डमध्ये सेगमेंटची निर्मिती करण्यात येत आहे. नागपूर मेट्रोच्या रिच-३ मध्ये हे सेगमेंट वापरले जातील. रिच-३ अंतर्गत सीताबर्डी चौक ते लोकमान्यनगर या दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो मार्गावर तसेच या मार्गावरील १० मेट्रो स्थानकावर हे सेगमेंट बसवून नंतर रुळाचे कार्य केले जाणार आहे.
सेगमेंट तयार करण्यासाठी अत्यंत कुशल कारागिराची गरज भासते. नागपूर मेट्रोच्या निर्मितीसाठी सेगमेंट तयार करण्याचे कार्य १७० कारागीर दिवसरात्र करीत आहेत. याशिवाय २०० पेक्षा जास्त अधिकारी, अभियंते, निरीक्षक आणि तंत्रज्ञ हिंगणा कास्टिंग यार्डमध्ये कार्यरत आहेत. याठिकाणी दररोज १७ तास काम करून ध्येयपूर्तीचा प्रयत्न महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात सेगमेंट आणि आय-गर्डर तयार करण्याचे कार्य सुुरू करण्यात आले. दररोज १० सेगमेंट तयार करण्यात येते. याठिकाणी ३५२ सेगमेंट व ७२ आय-गर्डर तयार करून खुल्या जागेत ठेवण्याची व्यवस्था आहे. येथून कंटेनरच्या मदतीने कार्यस्थळी पोहोचविल्या जातात. हिंगणा कास्टिंग यार्डात व्हायब्रेटर आणि सिमेंट कॉन्क्रिट तयार करणाºया मिक्सरची परिपूर्ण व्यवस्था आहे. नागपूर मेट्रोच्या रिच-३ चे कार्य पूर्ण होताच हिंगणा औद्योगिक कंपन्यांमध्ये कार्य करणाºया कर्मचाºयांसह अधिकाºयांसाठी मेट्रोचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि सोयीचा ठरणार आहे. या उद्देशाने नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे.

Web Title: Generation of 1000 segments in short time by Mahametro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.