मेट्रो प्रकल्पाच्या पिलरचे जिओग्राफिकल टॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 09:23 PM2019-07-24T21:23:55+5:302019-07-24T21:25:40+5:30

मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे.

Geographical tagging of the Pillar of Metro project | मेट्रो प्रकल्पाच्या पिलरचे जिओग्राफिकल टॅगिंग

मेट्रो प्रकल्पाच्या पिलरचे जिओग्राफिकल टॅगिंग

Next
ठळक मुद्दे५डी-बीम प्रणालीमुळे १० ते १७ टक्के बचत : कार्याची माहिती एका क्लिकवर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे.
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पात डिजिटल माध्यमाने प्रकल्पाचे कार्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येत आहे. यामुळे मुख्यत्वे डीपीआरमधील मंजूर खर्चातही बचत होत आहे. प्रकल्पाचे बांधकाम करीत असताना बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर केल्यास १० ते १७ टक्क्यापर्यंत बचत करता येते. प्रकल्पाचे कार्य सुरू असताना डिजिटल माध्यमाची निवड केल्याने भविष्यात संचालन आणि देखरेखीसाठी मोठी बचत महामेट्रोला होणार आहे.
५ डी-बीमच्या मदतीने पूर्ण केलेल्या कार्याचा आढावा घेता येतो. सर्वप्रथम संगणकावर डिश बोर्ड ५ डी-बीमची यंत्रणा सुरू करून हव्या असलेल्या कार्याची निवड करावी लागते. उदा. मॉडेल (मेट्रो पिलर) यावर क्लिक केल्यास सर्वप्रथम सदर पिलर हा कुठल्या जागी व कुठल्या रिचमध्ये आहे याची माहिती मिळते. या पिलरमध्ये कुठल्या प्रकारचे काँक्रिट, स्टील, वापरण्यात आले आहे व त्याची क्षमता काय, याची माहिती मिळते.
नागपूर मेट्रोच्या सर्व मेट्रो पिलरला जिओग्राफिकल टॅगिंग करण्यात आले असून, त्याचे लोकेशन तसेच त्या ठिकाणी कुठले गर्डर ठेवण्यात आले आहे, तसेच या पिलरच्या इतर घटकांची माहिती प्राप्त होते. हे कार्य कधी नियोजित होते आणि कधी पूर्ण झाले, याची माहिती मिळते. तसेच पुढील महिन्यात व सद्यस्थितीत काय नियोजन करण्यात आले आहे, याचीही माहिती करता येते. जर कुठल्या कार्याला उशीर होत असल्यास त्याची माहिती प्राप्त होऊन संबंधित कंत्राटदारावर दंड ठोठावता येतो. प्रत्येक महिन्यात संबंधित कंत्राटदाराने कार्य पूर्ण केले असल्यास संबंधित कंत्राटदार पेंमेंटकरिता ५ डी-बीमच्या एसएपी सॉफ्टवेअरमध्ये रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शनमध्ये पूर्ण केलेल्या कार्याची माहिती प्रदान करतो.
महामेट्रोद्वारे कंत्राटदाराने रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शनची माहिती जनरल कन्स्लटंटद्वारे तपासून केलेले कार्य योग्य असल्यास त्याला प्रमाणित करून सदर कार्याचे पेमेंट कंत्राटदाराला देण्यात येते. ५ डी-बीम प्रणालीमध्ये प्रत्येक कार्याकरिता कलर कोड ठरविण्यात आला असून, त्यामुळे कार्याची प्रगती दिसून येते.

Web Title: Geographical tagging of the Pillar of Metro project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.