पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 08:47 PM2019-03-02T20:47:12+5:302019-03-02T20:54:35+5:30
प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेलमुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिका मुख्यालयासमोरील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात सीएनजी बससेवेचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेलमुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिका मुख्यालयासमोरील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात सीएनजी बससेवेचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, माजी महापौर प्रवीण दटके, उपसभापती प्रवीण भिसीकर, स्थायी समितीचे भावी अध्यक्ष प्रदीप पोहाणे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तुºहाटी, तणस, उसाची मळी यापासून बायो-सीएनजीची निर्मिती होते. पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्याप्रमाणात होते. धानाच्या तणसापासूनही सीएनजी निर्माण करून यावर वाहने धावतील,असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय परिवहन मंत्रालयातर्फे मुंबई, नवी मुंबई, गुवाहाटी या शहरात मिथेनॉलवर चालणाऱ्या बसेसचा एक पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. गंगा ब्रम्हपुत्रामध्ये इॅथेनॉलवर संचालित इंजिनाच्या साहाय्याने जल वाहतूक होत आहे. यामुळे वाहतूक खर्चात घट झाली आहे. नागपूर शहरातही शंभर टक्के इॅथेनॉलवर चालणाऱ्या स्कॅनिया बस प्रकल्पाची चर्चा देशभरात होत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
मनपाची ७० कोटींची बचत
पेट्रोल, डिझेलवर चालणारी नागपूर शहरातील वाहने सीएनजीद्वारे संचालित झाल्याने नागपूर शहर जल-वायू प्रदूषणापासून मुक्त असे हरित शहर होईल. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या १५० बसेस तसेच महापालिकेची १५० वाहने सीएनजीवर धवातील. यातून ७० कोटींची बचत शक्य असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत केल्यास महामंडळाचा तोटा कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बसचे आयुष्य वाढणार
डिझेलवरील बसचे आयुष्य आठ वर्षेअसते. मात्र सी.एन.जी.मध्ये परिवर्तीत करण्यात येणाऱ्या बसमध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ए.आर.ए.आय.) तर्फे प्रमाणित व पोलंडद्वारे निर्मित सी.एन.जी. किटस लागणार आहे. अशा ग्रीन बसचे आयुष्य १५वर्षे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० बसेस सी.एन.जी.वर चालतील. यासोबतच महापालितील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बसेस सी.एन.जी.वर चालविण्यात याव्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.
जलसंधारण विभागाचे मुख्यालय नागपुरात- पालकमंत्री
जलसंधारण विभागाचे विदर्भाचे कार्यालय औरंगाबाद येथे होते. ते आता लवकरच नागपुरात सुरू होणार आहे. सोबतच मुख्य अभियंयाचे कार्यालय राहणार आहे. शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी दिली.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवास
महापालिकेच्या बसमध्ये शहीद जवानांचे कुटुंबीय व दिव्यांग व्यक्तींना संपूर्ण प्रवास मोफत दिला जाणार आहे. सी.एन.जी.चा डेपो खापरी येथे उभारला जाणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती कुकडे यांनी यावेळी दिली.