तुम्ही शुद्ध हवेसाठी नव्हे, दम्यासाठी घराबाहेर पडताय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 07:30 AM2022-03-08T07:30:00+5:302022-03-08T07:30:03+5:30

Nagpur News शुद्ध हवेसाठी बाहेर पडत असाल तर सावध व्हा.. बाहेरची हवा खरोखरीच तितकी शुद्ध राहिली आहे का हे जाणून घ्या..

Get out of the house for asthma, not for fresh air! | तुम्ही शुद्ध हवेसाठी नव्हे, दम्यासाठी घराबाहेर पडताय..

तुम्ही शुद्ध हवेसाठी नव्हे, दम्यासाठी घराबाहेर पडताय..

Next

 

 

नागपूर : वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. प्रदूषणासाठी कारणीभूत कार्बन डायऑक्साईड, नायट्राेजन, सल्फर डायऑक्साईड, ओझाेनसारख्या घटकांचे प्रमाण कमी असले तरी सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर (धुलिकण) हे प्रदूषणाचे सर्वात माेठे कारण ठरले आहे. अशात शहरातील हिरवळ कमी हाेत असल्याने ही वायू प्रदूषणाची समस्या अधिक तीव्रतेने वाढत आहे.

शहराचा एअर क्वाॅलिटी इन्डेक्स १३० ते १७०

नागपूर शहराचे इन्डेक्स १३० ते १७० एक्यूआयच्या सरासरीत असते. सध्या ११० ते १२० एक्यूआयच्या दरम्यान नाेंद केली जात आहे. मात्र दिवाळी, हाेळी, नवीन वर्षाच्या काळात यामध्ये २०० च्यावर ३०० एक्यूआयपर्यंत वाढ नाेंदविण्यात येते, जी धाेकादायक आहे.

इन्डेक्स १०० पेक्षा कमी हवा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार, एअर क्वाॅलिटी इन्डेक्स १०० च्या खाली असणे समाधानकारक मानले जाते. शहराचा सध्याचा इन्डेक्स हा माॅडरेटस्तरावर आहे. त्यात २०० पर्यंत वाढ झाल्यास धाेकादायक ठरताे.

कारणे काय?

माेठ्या प्रमाणात हाेत असलेले बांधकाम सर्वाधिक कारणीभूत आहे. उड्डाणपूल, मेट्राे, सिमेंट रस्ते यांचे काम वेगाने हाेत आहे. शहरालगत असलेले दाेन औष्णिक वीज केंद्राचे प्रदूषण धाेकादायक ठरले आहे.

घराबाहेर जाल, तर आजारी पडाल

खराब हवेमुळे अस्थमा, श्वसनाचे आजार व फुफ्फुसाचे आजार बळावण्याचा धाेका असताे. शिवाय डाेळ्यात जळजळ, त्वचेचे आजार, रक्तदाबात बदल, ॲलर्जी आदींच्या समस्या निर्माण हाेतात. कर्कराेगाचा धाेकाही असताे.

हवेची गुणवत्ता कशी सुधारणार?

सर्व नऊ स्टेशनचा डेटा घेऊन सरासरी काढल्यानंतरच येथील प्रदूषणावर भाष्य करता येईल. मात्र नागपूरसारख्या शहरात वायू गुणवत्ता माेजण्यासाठी किमान २० स्टेशन असणे आवश्यक आहे.

- काैस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल

अवैध वृक्षकटाई शहरात प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहे. विकास कामासाठी झाडांचा बळी हमखास जाताे. वृक्षताेड हाेत राहिली तर नागपूरची ग्रीन सिटी ही ओळख पुसली जाईल.

- अनसूया काळे-छाबरानी, स्वच्छ असाेसिएशन

प्रशासन काय करतेय?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एसआरओ आनंद काटाेले म्हणाले, शहरातील एअर क्वाॅलिटी माॅनिटरिंग सिस्टीम सुधारली जात आहे. महाल, एलआयटी व व्हीएनआयटी भागात तीन नवीन वायू परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून, वाडी व कामठीचे स्टेशनही सुरू केले आहे. शहरासाठी ॲक्शन प्लॅन तयार असून, नागपूर क्लीन सिटी निधीअंतर्गत एमपीसीबीसह नीरी, महापालिका व आरटीओ यांच्या सहकार्याने ताे राबविला जाईल.

Web Title: Get out of the house for asthma, not for fresh air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.