सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By admin | Published: March 21, 2016 02:58 AM2016-03-21T02:58:04+5:302016-03-21T02:58:04+5:30

केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना संविधानाशी काही देणेघेणे नाही.

Get ready to fight social revolutions | सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा

सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा

Next

नागपूर : केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना संविधानाशी काही देणेघेणे नाही. मनुस्मृतीला मानणारे कोण आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे. अशा शक्तिविरोधात लढण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी स्वीकारले आहे. या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईसाठी कार्यक र्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी रविवारी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या जयंती वर्षाचा समारोप ११ एप्रिलला नागपुरातील कस्तूरचंद पार्क येथे जाहीर सभेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी राणी कोठी येथे आयोजित विदर्भातील कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्र्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव मुकु ल वासनिक , माजी खासदार विलास मुत्तेमवार,विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, विधानसभेतील पक्षाचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नतीन राऊ त, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक ,आमदार सुनील केदार, यशोमती ठाकूर, अमर राजूरकर, हरिभाऊ राठोड, यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रमख पदाधिकारी उपस्थित होते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने विधानभवनावर काढलेल्या मोर्चाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ११ एप्रिलचाही कार्यक्रम असाच भव्य होणार आहे. यात देशभरातील काँग्रेसचे नेते सहभागी होतील. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख योगदान आहे. ११ एप्रिलचा कार्यक्रमही मोर्चाप्रमाणे यशस्वी होईल असा विश्वास मुकूल वासनिक यांनी व्यक्त केला . प्रा्रस्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी तर आभार नितीन राऊ त यांनी मानले.
जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) च्या अध्यक्ष सुनीता गावंडे, विदर्भातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

सोनिया व राहुल गांधी सभेला मार्गदर्शन करणार
जयंती वर्षाच्या समारोप कार्यक्रमासाठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना निमंत्रित केले आहे. ११ एप्रिलच्या कस्तूरचंद पार्क येथील जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी दीक्षाभूमीला भेट देऊ न अभिवादन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

Web Title: Get ready to fight social revolutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.