रक्तदान शिबिरांसाठी विविध समाजाचे सहकार्य घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:53+5:302021-02-10T04:08:53+5:30

महापौर : मनपाच्या रक्तपेढीचा लाभ घेण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी ...

Get the support of different communities for blood donation camps | रक्तदान शिबिरांसाठी विविध समाजाचे सहकार्य घ्या

रक्तदान शिबिरांसाठी विविध समाजाचे सहकार्य घ्या

Next

महापौर : मनपाच्या रक्तपेढीचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात रक्तपेढी आहे. ही रक्तपेढी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी वरदान ठरू शकते. या रक्तपेढीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे. सोबतच रक्तदान शिबिरांचे वर्षभर आयोजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मंगळवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत दिल्या.

आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा महापौरांनी घेतला. उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष् विजय झलके, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपायुक्त (कर) मिलिंद मेश्राम, नगर रचना सहायक संचालक हर्षल गेडाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, आदी उपस्थित होते.

दरवर्षी प्रत्येक समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाजातर्फे मोठे आयोजन करण्यात येते. या समाजातील नेत्यांसोबत, प्रतिष्ठित नागरिकांसोबत संपर्क साधून रक्तदानाचे आयोजन केल्यास समाजाचे मोठे योगदान लाभेल. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करा, असे महापौर म्हणाले.

Web Title: Get the support of different communities for blood donation camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.