भीती न बाळगता लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:10+5:302021-03-13T04:16:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : आपण सर्वजण वर्षभरापासून काेराेनाशी लढा देत आहाेत. काेराेनावर लस शाेधून काढण्यात भारतीय संशाेधकांना यश ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : आपण सर्वजण वर्षभरापासून काेराेनाशी लढा देत आहाेत. काेराेनावर लस शाेधून काढण्यात भारतीय संशाेधकांना यश आले आहे. त्यामुळे कुणीही मनात कसलीही भीती न बाळगता सर्व वयाेगटातील नागरिकांनी काेराेनाची लस टाेचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी कामठी तालुक्यातील गुमथळा व भूगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रांना दिलेल्या भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना केले.
प्रत्येकाने काेराेना लस घेणे आवश्यक आहे. शिवाय, काेराेना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने जारी केलेल्या उपाययाेजनांचेही काटेकाेर पालन करायला हवे. कारण काेराेनाचा प्रकाेप पूर्णपणे संपलेला नाही. संक्रमणातील चढउतार सुरू असल्याने प्रत्येकाला स्वत:साेबतच इतरांची काळजी घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आराेग्य केंद्रांसाेबतच शहरांमधील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरणाकडे ४५ ते ६० वर्षे वयाेगटातील व्यक्तींचा कल वाढत असल्याने ही समाधानाची बाब असल्याचेही याेगेश कुंभेजकर यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मलेवार, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने, गुमथळा व भूगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव या दाेन्ही प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच गावांमधील नागरिक उपस्थित हाेते.