गनी खान यांची एनडीएस पथकाला जिवे मारण्याची धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 08:25 PM2020-02-17T20:25:46+5:302020-02-17T20:27:02+5:30

साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपद्रव शोध पथकावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

Ghani Khan threatens to kill NDS squad | गनी खान यांची एनडीएस पथकाला जिवे मारण्याची धमकी 

गनी खान यांची एनडीएस पथकाला जिवे मारण्याची धमकी 

Next
ठळक मुद्देतहसील पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोन क्षेत्रातील रस्त्यावर ठेवलेल्या बांधकाम साहित्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपद्रव शोध पथकावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह पथकातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गनी खान यांच्याविरुद्ध तक्रार गुन्हा दाखल केला.
धोंडबा चौक, शीतला माता समाजभवनाजवळ वास्तव्यास असलेल्या गनी खान यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांनी बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने दोन दिवसापूर्वी गनी खान यांना पथकाने नोटीस बजावली होती. ४८ तासात बांधकाम साहित्य हटविण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही साहित्य न हटविल्याने एनडीएसचे पथक सोमवारी सकाळी कारवाई करण्यासाठी पोहोचले. पथकाला बघताच गनी खान पथकातील जवानांच्या अंगावर धावून आले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पथकातील जवानांनी वीरसेन तांबे यांना माहिती दिली तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचताच गनी खान तेथून पसार झाले. पथकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम १८६,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. मनपाचे अपर आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी ही माहिती दिली.

Web Title: Ghani Khan threatens to kill NDS squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.