‘खाऊ गल्ली’ की गर्दुल्यांचा अड्डा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:39 AM2017-11-01T01:39:11+5:302017-11-01T01:39:27+5:30

शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे. यासाठी महापालिकेने गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने ‘खाऊ गल्ली’ निर्माण केली आहे.

'Ghao Gali' garlands basement? | ‘खाऊ गल्ली’ की गर्दुल्यांचा अड्डा?

‘खाऊ गल्ली’ की गर्दुल्यांचा अड्डा?

Next
ठळक मुद्दे७२ लाखांचा प्रकल्प धूळखात े स्थळांची निवड कागदावरच े कशी होणार वाहतूक सुरळीत

गणेश हूड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे. यासाठी महापालिकेने गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने ‘खाऊ गल्ली’ निर्माण केली आहे. सोबतच या प्रकल्पामुळे गांधीसागरच्या सौंदर्यात भर पडली आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत या प्रकल्पावर ७२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु खाऊ गल्ली वर्षभरापासून वापराविना पडून असल्याने येथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी हा गर्दूल्यांचा अड्डा बनला आहे.
नागपूर शहरातील बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथच्या जागेवर चाटचे ठेले उभे राहातात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. ठेलेवाल्यांना महापालिकेच्या बाजारपेठेजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर सुविधा उपलब्ध करून त्यांना प्रस्थापित करण्याची संकल्पना साकार करण्यासाठी ‘खाऊ गल्ली’ निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने दोन वर्षापूर्वी घेतला होता. प्रकल्पाचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाही.
गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने खाऊ गल्ली प्रकल्प राबविण्याचा संकल्प स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त यांनी केला होता. त्यांच्या कार्यकाळात तलावाच्या काठावर २७ स्टॉलचे बांधकाम करण्यात आले. कारंजे लावण्यात आले. बसण्यासाठी ओटे, शेड उभारण्यात आले. पथदिवे व वृक्षारोपण करून आजूबाजूच्या परिसराचे सौंदयीकरण करण्यात आले. खाऊ गल्ली प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा होण्यासोबतच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याचा हेतू होता. गांधीसागर येथील प्रकल्प यशस्वी ठरला तर शहराच्या इतर भागातही हा प्रकल्प राबविला जाणार होता. यामुळे शहरातील अतिक्रमणालाही काही प्रमाणात आळा बसण्याला मदत होणार होती. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने खाऊ गल्ली धूळखात पडून आहे.

अंबाझरी फ्लो पॉर्इंट येथील प्रकल्प रखडला
गांधीसागर येथील खाऊ गल्लीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक जागांवर हा प्रकल्प राबविला जाणार होता. यात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्यात आलेल्या अंबाझरी फ्लो पॉर्इंटचाही समावेश होता. परंतु गांधीसागर येथील प्रकल्प धूळखात असल्याने तूर्त हा प्रकल्प रखडला आहे.
-तर कसे वाढणार उत्पन्न
बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असल्याचा दावा पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निविदासाठी एक-एक वर्ष रखडत असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार नाही. संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई झाली तरच काही प्रमाणात शिस्त लागण्याची आशा आहे.

Web Title: 'Ghao Gali' garlands basement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.