गिरीश व्यास यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
By Admin | Published: January 6, 2016 03:57 AM2016-01-06T03:57:33+5:302016-01-06T03:57:33+5:30
विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गिरीश व्यास यांचा मंगळवारी शपथविधी झाला.
नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गिरीश व्यास यांचा मंगळवारी शपथविधी झाला. व्यास हे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यास यांच्यासह परिषदेतील आठ नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम (उपक्रमासहित) राज्यमंत्री विजय देशमुख, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)