नागपुरात गळफास लावून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:21 AM2018-10-31T00:21:42+5:302018-10-31T00:22:31+5:30

जुना बाबुळखेडा परिसरातील वसंतनगरात राहणारी पायल दत्तराज करडभाजने (वय २०) हिने मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.

The girl committed suicide by hanging herself in Nagpur | नागपुरात गळफास लावून तरुणीची आत्महत्या

नागपुरात गळफास लावून तरुणीची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देद्वितीय वर्षांची विद्यार्थिनी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुना बाबुळखेडा परिसरातील वसंतनगरात राहणारी पायल दत्तराज करडभाजने (वय २०) हिने मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.
पायल डीएनसीची द्वितीय वर्षांची विद्यार्थिनी होती. तिचे वडील फिर्यादी दत्तराज खेमाजी करडभाजने (वय ४७) यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

एसीने घेतला चिमुकल्याचा बळी
घराच्या छतावर खेळणाऱ्या चिमुकल्याला एसीचा करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला. समीर शान मुंशी (वय सात वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
शान अंजान मुंशी हे जरीपटक्यातील हुडको कॉलनीत राहतात. त्यांचा सात वर्षीय मुलगा समीर हा सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घराच्या छतावर खेळत होता. एसीच्या उपकरणाजवळ जाताच त्याला करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्याला मानकापूरच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

वृद्धाने लावला गळफास
गोपाळकृष्णनगर, वाठोडा लेआऊटमध्ये राहणाऱ्या एका वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. उत्तमराव भेंदूजी लांडे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दौलतराव बाजीराव येरखेडे (वय ४७, रा. शैलेशनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The girl committed suicide by hanging herself in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.