मुलगी असते लक्ष्मीचे वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:05+5:302021-05-16T04:08:05+5:30

नागपूर : विश्व शांती ऋषभोत्सवांतर्गत श्री धर्मराजश्री तपोभूमि दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाइन धर्मसभा सुरू आहे. ...

The girl is Lakshmi's boon | मुलगी असते लक्ष्मीचे वरदान

मुलगी असते लक्ष्मीचे वरदान

Next

नागपूर : विश्व शांती ऋषभोत्सवांतर्गत श्री धर्मराजश्री तपोभूमि दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाइन धर्मसभा सुरू आहे. आचार्यश्री गुप्तिनंदीजी गुरुदेव यांनी धर्मसभेत मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलगी ही लक्ष्मीचे वरदान असते. मुले भाग्याने होतात आणि मुलगी सौभाग्याने होते. मुलगा अंश आहे तर मुलगी वंश आहे. स्त्रीशिवाय आयुष्य नाही. त्यामुळे मुलगा आणि मुलीत कधीच भेदभाव करू नका. आर्यिका प्रज्ञाश्री माताजी यांनी सांगितले की, देव, शास्त्र, गुरुप्रती आदरभाव असणे म्हणजे भक्ती होय. आपल्या कामावर प्रेम करा. आपल्या भक्तीवर लक्ष द्या. भगवानाची भक्ती तुमच्या आतून दिसली पाहिजे. कोरोना या आजाराची भीती आपल्याला बाळगायची नाही. तर या आजाराचा सामना करायचा आहे. १६ मे रोजी सकाळी ७.२० वाजेपासून शांतीधारा, सकाळी ९ वाजता श्रुत केवली वैज्ञानिक धर्माचार्य कनकनंदीजी गुरुदेव यांचे मार्गदर्शन, सायंकाळी ७.३० वाजेपासून रिद्धी मंत्र, भक्तामर पाठ, महामृत्युंजय जप, आरती आणि चालिसा होणार आहे.

............

Web Title: The girl is Lakshmi's boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.