महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:53 PM2018-11-03T12:53:09+5:302018-11-03T12:55:26+5:30

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Girl saved from rape due to vigilance of woman; Events in Nagpur | महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

Next
ठळक मुद्देशेजाऱ्यावर विनयभंगाचा आरोपहुडकेश्वर पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेश दीनानाथ शांडिलकर (वय ३५) याला अटक केली आहे.
आरोपी राजेश आणि पीडित परिवार आजूबाजूला राहतात. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास बाजूची चार वर्षीय चिमुकली आपल्या अंगणात खेळत असताना आरोपी राजेशने तिला खाऊचे आमिष दाखवून उचलून नेले. तो तिला आपल्या घरात घेऊन गेला आणि त्याने दार लावून घेतले. दार लावताना तो संशयास्पद अवस्थेत इकडे तिकडे बघत असल्याने त्याच्या बाजूला राहणाऱ्या एका महिलेने बघितले. तिने आपल्या शेजाऱ्यांना सांगून आरोपी राजेशच्या कलुषित इराद्याबद्दल शंका व्यक्त केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी लगेच त्याच्या दारावर थाप मारून त्याला दार उघडण्यास बाध्य केले आणि चिमुकलीला जवळ घेऊन तिच्या आईकडे नेऊन दिले. त्याची एकूणच अवस्था बघून तो चिमुकलीसोबत लज्जास्पद प्रकार करणार होता, अशी शंका आल्याने शेजाऱ्यांनी त्याची धुलाई केली. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेशविरुद्ध विनयभंगाचे कलम ३५४ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकारामुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले होते. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीचे भविष्य बचावले.

Web Title: Girl saved from rape due to vigilance of woman; Events in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.