मुलींचा बास्केटबॉल नागपूर संघ ठरला ‘चॅम्पियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:54 AM2018-08-02T11:54:17+5:302018-08-02T11:54:55+5:30
मुलींच्या नागपूर जिल्हा संघाने बुधवारी ४५ व्या सबज्युनियर राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. नागपूर संघाची जेतेपदाची ही सलग दुसरी वेळ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलींच्या नागपूर जिल्हा संघाने बुधवारी ४५ व्या सबज्युनियर राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. नागपूर संघाची जेतेपदाची ही सलग दुसरी वेळ आहे. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनच्या यजमानपदाखाली बालेवाडी (पुणे) येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अंतिम लढतीत नागपूर संघाने यजमान पुणे संघाला ६७-५९ अशा फरकाने पराभूत केले. चार क्वॉर्टरमध्ये २०-१२, १६-१४, १५-११, १६-२२ असा गुण फलक होता. विजेत्या संघाकडून धारा फाटे २२, शोमिरा बडिये १८, समीक्षा चांडक ९, स्वाती वानखेडे ७ तसेच अवनी बांठिया, मिहिका मेश्रामने प्रत्येकी चार गुणांची भर घातली.
विजेत्यासंघात धारा फाटे, समीक्षा चांडक, अवनी बांठिया, श्रेया गुप्ता, शोमिरा बडिये, शर्वरी नेने, स्वाती वानखेडे, मिहिका मेश्राम , अद्रिजा बिश्वास , अनिशा सोनटक्के , सूर्यश्री धोंडारकर यांचा समावेश आहे. प्रशिक्षक शत्रुघ्न गोखले, सहाय्यक प्रशिक्षक अरविंद गरुड आणि व्यवस्थापक धीरज कडव होते.