मुलीचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:25+5:302021-07-16T04:07:25+5:30

- डॉ. रिचाज युनिक क्लिनिक व युनिक हेल्थ ॲण्ड ब्यूटीमालचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ ...

The girl's birthday was celebrated by a blood donation camp | मुलीचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा

मुलीचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा

Next

- डॉ. रिचाज युनिक क्लिनिक व युनिक हेल्थ ॲण्ड ब्यूटीमालचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियानात प्रसिद्ध ब्यूटीशियन डॉ. रिचा राजकुमार जैन यांनी मुलगी तनिष्का जैन हिच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. वाढदिवसाला शुभेच्छा आणि राष्ट्रीय कर्तव्याचे गिफ्ट यावेळी रक्तदात्यांनी दिले.

डॉ. रिचाज युनिक क्लिनिक व युनिक हेल्थ ॲण्ड ब्यूटीमालच्या वतीने ३६, गांधी ग्रेन मार्केट, टेलिफोन एक्स्चेंज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी झाले. शिबिराचे उद्घाटन समाजसेवक नरेंद्र सतीजा व राजकुमार जैन यांनी रक्तदान करून केले. यावेळी रेनबो ब्लड बँकेच्या चमूची उपस्थित होती. यावेळी पुलक मंच परिवारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, महावीर वाॅर्ड शाखा अध्यक्ष शरद मचाले, नरेश मचाले, रमेश उदापूरकर, दिलीप तावलकर, शीतल जैन, सुरेश डायमण्ड, दिगंबर जैन महासमितीचे महाराष्ट्र महामंत्री सुधीर आग्रेकर, भाग्योदय तीर्थचे विश्वस्त राजाभैया, ऋतुराज जैन, शहर काँग्रेस कमिटीचे राजाभाऊ, महेश श्रीनिवास, समाजसेवक सुभाष कोटेचा, जैन सेवा मंडळाचे महामंत्री अभय सहकार, खुशी जैन, हनी जैन, वर्षा, केतकी, प्रिया, अर्चना, प्रवीण, ममता, जगदीश, बाबू उपस्थित होते.

-------------

वाढदिवसाचा आनंद समाजसेवेने करावा - रिचा जैन

रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याचा आनंद सर्वोत्तम आहे. देशातील प्रत्येक मुलाने अशाच प्रकारे समाजसेवेचा आदर्श पुढे ठेऊन कार्य करावे. तुमचा एक पुढाकार देशाचे भविष्य सुरक्षित करणारे असल्याची भावना डॉ. रिचा राजकुमार जैन यांनी यावेळी व्यक्त केली.

..............

Web Title: The girl's birthday was celebrated by a blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.