मिहान प्रकल्पग्रस्तांना १० लाखाची मदत द्या

By admin | Published: December 18, 2014 02:49 AM2014-12-18T02:49:48+5:302014-12-18T02:49:48+5:30

विक्तुबाबानगर येथील रहिवाशांच्या विविध मागण्यांसाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Give 10 lacs to MIHAN project affected people | मिहान प्रकल्पग्रस्तांना १० लाखाची मदत द्या

मिहान प्रकल्पग्रस्तांना १० लाखाची मदत द्या

Next

नागपूर : विक्तुबाबानगर येथील रहिवाशांच्या विविध मागण्यांसाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचा मोर्चा यशवंत स्टेडियममधून निघाला. मोर्चा मुंजे चौक, आनंद टॉकीज, मानस चौक, गणेश टेकडी उड्डाणपुलाखालून स्टेशन रोडने जयस्तंभ चौकात आला. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स येथे पोलिसांनी हा मोर्चा अडवून धरला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे हे निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले.
नेतृत्व
संजय बोंडे, नटराजन पिल्लई, अनिल पाचोळे
मागण्या
प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक घरातील वयोवृद्ध नागरिकांना १० लाख रुपये मदत करावी
प्रत्येक कुटुंबाला १५०० चौरस फुटाची जागा द्यावी
घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी
घरातील सर्व सदस्यांना बीपीएलची मान्यता आणि आरोग्य सुविधा द्यावी
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकास ३० लाख रुपये कर्ज द्यावे

Web Title: Give 10 lacs to MIHAN project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.