पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 20:13 IST2018-07-09T20:12:38+5:302018-07-09T20:13:59+5:30

पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त असो त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस कुटुंबाच्या मोर्चाने विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा पावसातही ठाण मांडून होता.

Give 10 percent reservation in police recruitment | पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या

पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या

ठळक मुद्देपोलीस कुटुंबाचा मोर्चा : पोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला आघाडीने दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त असो त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस कुटुंबाच्या मोर्चाने विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा पावसातही ठाण मांडून होता.
पोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला आघाडीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. पोलीस विभाग हा अनुशासन व शिस्तीचा विभाग असल्यामुळे समाजाची रक्षा व सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांना स्वत:वर होणाऱ्या अन्यायाकरिता लढता येत नाही, परंतु पोलीस कुटुंब त्यांच्या मागण्यांकरिता लढू शकते, हे या मोर्चातून दाखवून दिले आहे, असे मत जानरावजी लोणकर यांनी येथे व्यक्त केले. मोर्चातील शिस्तबद्धता लक्ष वेधून घेणारी होती.
या मोर्चाचे नेतृत्व जानराव लोणकर, किशोर ढोणे, वर्षा मारबते, सविता उईके, वैशाली कांबळे, आशिष कावळे, प्रिया ढोणे आदींनी केले. शिक्षणाच्या योग्यतेनुसार अनुकंपाच्या जागा भरा, महाराष्ट्र कुटुंब कल्याण योजना बंद करून नवीन योजना सुरू करा,पोलिसांना वेतन राष्ट्रीय  बँकमधूनच अदा करा, सेवानिवृत्तीनंतर आजन्म पेन्शन द्या, अशा अन्य मागण्या होत्या.

Web Title: Give 10 percent reservation in police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.