दीक्षाभूमीसाठी जाहीर केलेले ४० कोटी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:53 PM2019-06-27T21:53:43+5:302019-06-27T21:55:20+5:30

मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली.

Give 40 crores declared funds to Deekshabhoomi | दीक्षाभूमीसाठी जाहीर केलेले ४० कोटी द्या

दीक्षाभूमीसाठी जाहीर केलेले ४० कोटी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकाश गजभिये यांची विधान परिषदेत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली.
गजभिये म्हणाले, दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास करण्यासाठी ३२५ कोटी रुपयांची विकास योजना तयार करण्यात आली. त्यातील ४० कोटी रुपयाचा हा धनादेश होता. संबंधित धनादेश नागपूर सुधार प्रन्यासला प्रदान करण्यात आला होता. परंतु या निधीला प्रशासकीय मंजुरीच प्रदान करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेला हा निधी अनेक महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरीसाठी अडकून पडला आहे.
दीक्षाभूमीशी संबंधित प्रत्येक काम रेंगाळत असल्याने आंबेडकरी जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन व खोटे धनादेश देण्याचा प्रकार युती सरकारने चालविला आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.

Web Title: Give 40 crores declared funds to Deekshabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.