दिव्यांगांना हक्काचा ५ टक्के राखीव निधी त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:28+5:302021-04-28T04:09:28+5:30
कामठी : केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ३७ (ब) मधील तरतुदीनुसार नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना ...
कामठी : केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ३७ (ब) मधील तरतुदीनुसार नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत ५ टक्के राखीव निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अरविंद हिंगे यांना मंगळवारी सादर करण्यात आले.
शिष्टमंडळात सुनील हजारे, अरुण पौणीकर, विजय फुले, सुभाष राऊत, परमानंद मेश्राम, शौकत अली यांचा समावेश होता.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाची पहिली लाट संपण्यापूर्वीच दुसरी लाट आली. यात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. अशात त्यांना सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे असल्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.