सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

By admin | Published: March 11, 2016 03:16 AM2016-03-11T03:16:19+5:302016-03-11T03:16:19+5:30

सावित्रीबाई फुले यांच्या ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्थांतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले.

Give Bharat Ratna to Savitribai Phule | सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

Next

विविध संस्थांतर्फे आदरांजली : शहरात सर्वत्र अभिवादन कार्यक्रम
नागपूर : सावित्रीबाई फुले यांच्या ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्थांतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबार्इंनी केलेल्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन करून सावित्रीबार्इंना त्यांच्या कार्यासाठी भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
भाजप दलित मित्र
म.फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित करावे म्हणून भाजप दलित मित्र संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आली. हा कार्यक्रम कॉटन मार्केट चौकातील म.फुले यांच्या प्रतिमेजवळ झाला. याप्रसंगी भाजपचे नेता आनंदराव ठवरे आणि उपाध्यक्ष भूषण दडवे उपस्थित होते. भूषण दडवे यांच्या मार्गदर्शनात याप्रसंगी धरणे देण्यात आली.
त्यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव शासनाकडे १६ वर्षापासून प्रलंबित आहे, या मागणीकडे याप्रसंगी लक्ष वेधण्यात आले. भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक जाहीर करून फुले दाम्पत्याचे मूळ गाव गटगुणला पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
अ.भा.म.फुले समता परिषद
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने कॉटन मार्केट येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने महानगर अध्यक्ष श्याम चौधरी, वनिता लांडगे, अलकाताई कांबळे, शोभा भगत, सुरेंद्र आर्य, दशरथ तालेवार, रमेश गिरडकर, राजेश रंगारी, चिंतामण लक्षणे, राजेश रहाटे, विजय शेंडे, शैलेश मानकर, सुरेश गजभिये, गजानन लांडगे, नरेंद्र आगलावे, मिलिंद पाचपोर, सुधीर दुबे, सचिन भोयर, प्रशांत माडेवार, परमानंद अंबादे आणि समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर महिला काँग्रेस
शहर महिला काँग्रेसच्यावतीने प्रज्ञा बडवाईक यांच्या हस्ते कॉटन मार्केट येथील सावित्रीबार्इंच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी संध्या ठाकरे, संगीता उपरीकर, आशा कुर्वे, पूजा गावंडे, रेखा थूल, नलिनी करांगळे, माया घोरपडे, कविता हिंगणीकर, नीता नगरारे, विमल वाघमारे, धनश्री बावणे, सुषमा पटले, अर्चना कछवाह, रंजना वेरुळकर आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशन
नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशनच्यावतीने कॉटन मार्केट येथील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्र माला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, डॉ. मिलिंद जीवने, गौतम ढेंगरे, डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्रशांत बन्सोड, अरुण गाडे, रवी पोथारे, अमोल हिरेखण, पंकज चवरे आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा फुले शिक्षण संस्था
म. फुले शिक्षण संस्थेच्यावतीने रेशीमबाग येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रकाशिका अरुणा सबाने यांनी स्वत:चे उदाहरण देऊन स्त्रियांनी सक्षम होण्याची गरज व्यक्त केली. प्रमुख अतिथी मनिषा महात्मे यांनी स्त्री पालकत्व आजच्या युगात किती गंभीर आहे, याचे महत्त्व सांगितले. पायल राऊत या बालिकेने चिंतन गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, संजय नाथे, डॉ. मंजुषा सावरकर उपस्थित होत्या. आभार संस्थेचे सुरेंद्र आर्य यांनी मानले. डॉ. सायली सारडे यांनी संचालन केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंदा बहुउद्देशीय समाज विकास संस्था
सेवाभावी सर्वधर्म सन्मान मंदा बहुउद्देशीय समाज विकास संस्थेद्वारे कॉटन मार्केट येथील सावित्रीबार्इंच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई वैरागडे यांनी आपेल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रज्ञा पाटील, देवंगणा मेश्राम, आलोक शारदा, नेहा प्रामुख्याने उपस्थित होते.
अखिल भारतीय माळी महासंघ
महासंघाच्यावतीने कॉटन मार्केट चौकातील सावित्रीबार्इंच्या पुतळ्याला संघटक वसुधाताई येनुरकर यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे, गोविंदराव वैराळे, रमेश गिरडकर, नानाभाऊ लोखंडे, रामेश्वर भोपळे, मधुसूदन देशमुख, कैलास जामगडे, मिलिंद पाटपोर, देवराव प्रधान, राजेंद्र पाटील, बंडू भिवगडे, प्रदीप मांदाडे आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या हस्ते सावित्रीबार्इंच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी सत्यदेव रामटेके, डॉ. सोहन चवरे, परशराम गोंडाणे, डॉ. बाळासाहेब बन्सोड, डॉ. सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
पार्टीतर्फे सावित्रीबार्इंच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम कॉटन मार्केट येथील सावित्रीबार्इंच्या पुतळ्याजवळ पार पडला. याप्रसंगी ईश्वर कडबे, डॉ. विनोद रंगारी, पाझारे, माया मेश्राम, सी.टी. बोरकर, सी.जे. बोरकर, विलास पारखंडे, शेवंताबाई मेंढे, रेखा मेश्राम, शिंगाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
मंचातर्फे बर्डीच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबार्इंना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला भीमराव फुसे, वंदना भगत, नंदा गोडघाटे, नरेंद्र चव्हाण, हेमराज टेंभुर्णे, सौरभ बोरकर, सिद्धार्थ कुर्वे, जे. के. रमण, भरत जवादे, आनंद सायरे आदी उपस्थित होते.
अशोका बुद्धिस्ट मायनारिटिज मल्टिपरपज सोसायटी
सोसायटीच्यावतीने कॉटन मार्केट परिसरातील सावित्रीबार्इंच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी भदंत हर्षदीप यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अरुण साखरकर यांनी तर आभार सिद्धार्थ बन्सोज यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Give Bharat Ratna to Savitribai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.