श्री संत गाडगे बाबा यांना "भारतरत्न" द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:51+5:302021-06-16T04:09:51+5:30

नागपूर : श्री संत गाडगेबाबांच्या विचाराचा सन्मान म्हणुन भारत सरकारने त्यांना " भारतरत्न " देऊन सन्मानित करावे, ...

Give "Bharat Ratna" to Shri Sant Gadge Baba () | श्री संत गाडगे बाबा यांना "भारतरत्न" द्या ()

श्री संत गाडगे बाबा यांना "भारतरत्न" द्या ()

Next

नागपूर : श्री संत गाडगेबाबांच्या विचाराचा सन्मान म्हणुन भारत सरकारने त्यांना " भारतरत्न " देऊन सन्मानित करावे, असे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळातर्फे देण्यात आले.

धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मडळाचे प्रदेश महासचिव संजय भिलकर यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भ अध्यक्ष मनीष वानखेडे, उपाध्यक्ष रमेश काळे, नागपूर शहर अध्यक्ष अरविंद क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते जगदिश थपीयाल, दुर्गादासजी जिचकार यांनी संबंधित निवेदन दिले. महाराष्ट्र सरकारने सन २००० मध्ये "श्री संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान " सुरू केले. या अभियानाने स्वच्छतेची क्रांती घडून आली. लोक स्वत: आपले गाव स्वच्छ करु लागले सरकारने सुद्धा स्वच्छ सुंदर दिसणाऱ्या गावाला पुरस्कार देऊन सन्मानित केले. म्हणून भारत सरकारने श्री संत गाडगेबाबा यांच्या कार्यांचा त्यांच्या विचारांचा सन्मानार्थ " भारतरत्न "ने सन्मानित करून भारत स्वच्छता अभियानालासुध्दा " श्री संत गाडगेबाबा " यांचे नाव देऊन गौरवन्वित करावे, अशी शिफारस भारत सरकारला राज्यपालांनी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये पापाजी शिवपेठ, दीपक सौदागर, मनोज कापसे, योगेश शिरपूरकर, राजू सेलृकर, रमेश मोकलकर, नीलेश सौदागर, प्रकाश जुनघरे, विजय लोणारे, दिलीप टाकळकर, घनश्याम कनोजिया, वामनराव ठाकरे, प्रमोद क्षीरसागर आदींचा समावेश होता.

Web Title: Give "Bharat Ratna" to Shri Sant Gadge Baba ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.