डीपीसीच्या कामांचे १० सप्टेंबरपूर्वी कार्यादेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:15 PM2019-08-26T22:15:30+5:302019-08-26T22:17:16+5:30

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या निधीच्या विविध विकास कामांचे कार्यादेश १० सप्टेंबरपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

Give DPC work orders before 10 September | डीपीसीच्या कामांचे १० सप्टेंबरपूर्वी कार्यादेश द्या

डीपीसीच्या कामांचे १० सप्टेंबरपूर्वी कार्यादेश द्या

Next
ठळक मुद्देजि.प. सभागृहात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या निधीच्या विविध विकास कामांचे कार्यादेश १० सप्टेंबरपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोयर आदी उपस्थित होते.
समाजकल्याण विभागाने २०१८-१९ चा सर्व निधी खर्च केला असून, २०१९-२० चे सर्व नियोजन झाले आहे. या कामांचे बी १ निविदा काढून कामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य विभागाने जुन्या ३ आणि नवीन २ आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम केले आहे. १० कोटी रुपये डीपीसीने या विभागाला दिले होते. उपकेंद्र बांधकाम विस्तारीकरणासाठ़ी ३ कोटी देण्यात आले. मोडकळीस आलेल्या उपकेंद्राच्या इमारतींची दुरुस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देशही दिले. तसेच यंत्रसामुग्रीसाठी हाफकिन्सला दिलेले पैसे परत घेऊन त्या पैशातून रुग्णवाहिका घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. टंचाई विभागाला २० कोटी रुपये नागरी सुविधांसाठी दिले. पाणीपुरवठा विभागामार्फत मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेचे सर्व कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. यासाठी प्राप्त झालेले १२ कोटी खर्च झाले. सिंचन विभागाला २०१८-१९ चा मिळालेला निधी पाझर तलाव दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला.
बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची कामे सुरू आहेत. ७२ कामांपैकी २६ कामे शिल्लक आहेत. सर्व कामाचे कार्यादेश १० सप्टेंबरपर्यंत देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व रस्ते पावणेचार मीटरपेक्षा जास्त रुंदीचे असले पाहिजे, असेही सांगितले. महिला व बालकल्याण विभागाने ५ कोटी रुपये अंगणवाड्यांच्या व शौचालयाच्या बांधकामावर खर्च केले. सन २०१९-२० साठी ९ कोटी रुपये १४३ नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामावर खर्च केले जाणार आहेत.
कृषी विभागाला देण्यात आलेल्या २०१८-१९ चा सर्व निधी योजनांवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यात विषबाधा प्रतिबंधक मोहीम राबविण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सर्वांना घरे २०२२ योजनेंतर्गत १०,८१५ घरे पूर्ण केली आहेत. कच्ची घरे असणाऱ्या नागरिकांना पक्की घरे देण्यात येणार आहेत. बी १ निविदा गटविकास अधिकारीस्तरावर काढून कामाचे कार्यादेश लवकरच देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title: Give DPC work orders before 10 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.