महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:16 PM2018-08-28T23:16:51+5:302018-08-28T23:18:03+5:30
महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली.
महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी समितीचे निवेदन स्वीकारले आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले की, फक्त विदर्भातील तरुण-तरुणींनाच नोकऱ्या देण्यात याव्यात, विदर्भाबाहेरील तरुणांना नोकºया देऊ नये तसेच मेट्रोमधील गाळ्यांमध्येसुद्धा विदर्भातील व्यापाºयांना व्यवसायाची संधी द्यावी. विदर्भातील जनता मेट्रोला एक टक्का देत असेल तर विदर्भातील तरुणांनाच मेट्रोमध्ये नोकºया मिळाल्याच पाहिजे.
नागपूर युवा शहर अध्यक्ष मुकेश मासूरकर म्हणाले, वैदर्भीय युवकांना मेट्रोमध्ये नोकºया दिल्या नाही तर विदर्भातील बेरोजगार आंदोलन आणखी तीव्र करू. राजकुमार नागुलवार म्हणाले, मेट्रो असो वा इतर कारखाने किंवा सरकारी नोकºया सर्व ठिकाणी फक्त विदर्भातील तरुणांनाच संधी द्या.
आंदोलनात नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरुण केदार, विजया धोटे, गणेश शर्मा, अरविंद देशमुख, अनिल केशरवानी, मंगलमूर्ती सोनकुसरे, प्रभाकर काळे, रंजना मामर्डे, अभ्युदय कोसे, हिमांशू देवघरे यांच्यासह १५० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.