मुलींना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्या : निशा सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 09:33 PM2018-03-07T21:33:49+5:302018-03-07T21:44:52+5:30
येणाऱ्या काळात मुलींना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या काळात मुलींना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांनी केले.
आबासाहेब खेडकर सभागृह येथे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरोग्य विभागाच्यावतीने विविध जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती पुष्पा वाघाडे, समाज कल्याण समिती सभापती दीपक गेडाम, माया कुसुंबे, सरिता रंगारी, शुभांगी गायधने, शकुंतला वरकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन प्रभारी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुरेखा चौबे यांनी केले. तर योगेश निकम यांनी आभार मानले.
नवेगाव खैरी व फेटरीने पटकावले सर्वाधिक पुरस्कार
विविध पुरस्काराच्या श्रेणीत आरोग्य केंद्र नवेगाव खैरी तसेच फेटरीने सर्वाधिक तीन पुरस्कार प्राप्त केले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथम पुरस्कार नवेगाव खैरी, द्वितीय टाकळघाट, तृतीय कोंढाळी, उपकेंद्रामध्ये प्रथम फेटरी, द्वितीय नवेगाव साधु, तृतीय महालगाव, ग्रामीण रुग्णालयामध्ये काटोल, आरोग्य सहायकामध्ये प्रमिला राऊत, पी. एस. घाटोल, छाया खारवे, आरोग्य सेविकांमध्ये ममता आत्राम, रंजना चंदनखेड, दुर्गा कावर्ती, मंगला गाडगे, उषा कांबळे व गीतांजली वैद्य, सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार अर्चना साखरकर व सारिका ठवकर, नाविन्यपूर्ण आरोग्य सखी पुरस्कार सरिता दुपारे, सुनिता वर्धे, भूमिता पहाडे, पूनम तिडके, आशागट प्रवर्तक पुरस्कार भूमिता भगत व श्यामलता बोरकर, सरला मस्के. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गिलानी, डॉ. आनंद गजभिये, डॉ. चेतन नाईकवार यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोहपा, मांढळ, कोंढाळी, तितूर, कविता बोंदरे, कांचन चंदनखेडे, एम. एस. अढावू, एस. झेड. परतेती, तारा नायडू, आरोग्य सेवक ए. एन.गेडाम, एस. के. नन्नावरे, वाय. व्ही. चंदनखेडे, चंद्रशेखर नागपुरे, बी. बी. खराबे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळघाट यास प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र मकरधोकडा, बेला, धापेवाडा, नवेगाव खैरी, भंडारबोडीला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत दोन मुलींवर नसबंदी करणाऱ्या काजल अंबादास कोकर्डे व माधुरी सुरेंद्र मोहोड या दाम्पत्यास विशेष अर्थसाहाय्य देऊन सन्मानित करण्यात आले.