नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:51 PM2018-06-05T22:51:18+5:302018-06-05T22:51:31+5:30
सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजप- शिवसेना सरकार चार वर्षात नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देऊ शकले नाही. उलट त्यांना बेघर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे , महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्या पावसाळ्यात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली. मंगळवारी गजभिये यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयापुढे निदर्शने करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजप- शिवसेना सरकार चार वर्षात नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देऊ शकले नाही. उलट त्यांना बेघर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे , महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्या पावसाळ्यात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली. मंगळवारी गजभिये यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयापुढे निदर्शने करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटाची जागा मिळणार असून त्यापेक्षा जास्त जागेसाठी रेडिरेकनरच्या दरानुसार रक्कम आकारणार आहे. ही जागा त्यांना ३० वर्षाकरीता लीजवर दिली जाणार आहे. झोपडपट्टी धारकांना या जागेचे पुन्हा नुतनीकरण करावे लागेल. याबातचे हमीपत्र ३ महिन्यात शासनाकडे सादर करण्याची अटही करण्यात आली. याची पूर्तता त्यांनी न केल्यास लीज रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे असणार आहे .या निर्णयामुळे १२ ते १५ लाख झोपडपट्टीधारकांवर कोट्यवधी रुपयाचा भुर्दंड पडणार असल्याचा आरोप गजभिये यांनी केला
यावेळी अविनाश तिरपुडे, गोपी आंभोरे, सर्वजित चहांदे, विजय गजभिये, अजय मेश्राम, अजय टाक, शाहिद शेख, विनोद चहांदे, कुमार रामटेके, बाबुराव पांचाळ, राहुल साठे, मेवालाल सरोज, गजानन उबाळे, दौलतराव मुळे, विलास चहांदे, मालती वाघधरे, अशोक झोडापे, घनश्याम तराळे, प्रकाश टेवरे, किशोर बागरी, मन्नु विराह, मोहनलाल सरोज, सुनील राऊत, विजू सिरीया, विशाल चहांदे, सुंदरसिंग ठाकून, सचिन गायकवाड, किशोर देऊ ळकर, शुभम फुलझेले, विशाल वाघधरे, विनोद गौर, सेवक गौर, नरेंद्र हाडके, अंजली सिरीया, यशोदा पांचाळ, ममता चहांदे, दीपमाला रंगारी, गंगुबाई मुळे, कल्पना रामटेके, ताराबाई गौर, प्रतिमा गायकवाड, कांचन चहांदे, लक्ष्मी सरोज, राना वाघधरे, पुष्पा साठे, सीमा चहांदे, भोजवंती उके, अविनाश रंगारी, बबलू झोडापे, लता बागरी, शारदा रामटेके, ज्योती तराळे, सिध्दार्थ वाघधरे, पूर्णा झोडापे, सुषमा ठाकूर, सुशिल ठाकूर, शारदा सरोज यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.