‘पैसे दे नाहीतर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन’; मुलीला फसवणाऱ्या आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Published: June 22, 2024 05:42 PM2024-06-22T17:42:43+5:302024-06-22T17:42:57+5:30

इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मागीतली खंडणी

'Give me money or I will make obscene photos and videos viral'; Accused who cheated girl arrested at Nagpur | ‘पैसे दे नाहीतर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन’; मुलीला फसवणाऱ्या आरोपीस अटक

‘पैसे दे नाहीतर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन’; मुलीला फसवणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अटकवून तिला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बजाजनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

समर्थ पराग भोसले (२३, रा. गंगा निवास, नाईक रोड महाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. तर २० वर्षीय युवती अंबाझरी येथील एका महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षाला शिकते. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. २५ फेब्रुवारी ते १७ जून २०२४ दरम्यान इन्स्टाग्रामवर चॅटींग करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु नंतर आरोपी समर्थने युवतीला आपली अडचण असल्याचे सांगून तिच्याकडून वेळोवेळी ३० हजार रुपये घेतले. त्यानंतरही आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावून ५ हजार रुपये मागीतले. पैसे न दिल्यास अश्लील फोटो आणि व्हीडीओ बनवून तो व्हायरल करण्याची व युवतीच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली. आरोपी समर्थच्या नेहमीच पैसे मागण्याला कंटाळून युवतीने बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३८६, ३५४ (क), (ड), २९४ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

आरोपी कुख्यात गुन्हेगार
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी समर्थ भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. यापूर्वी बजाजनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध घर जाळल्याचा तर कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा गैरफायदा घेतला.

Web Title: 'Give me money or I will make obscene photos and videos viral'; Accused who cheated girl arrested at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.