मेट्रो रेल्वेसाठी एनओसी लवकर द्या
By admin | Published: December 31, 2014 01:10 AM2014-12-31T01:10:37+5:302014-12-31T01:10:37+5:30
मेट्रो रेल्वे योजना वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी आवश्यक सर्वप्रकारच्या एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष
दीक्षित-वर्धने भेट : विविध विषयांवर चर्चा
नागपूर : मेट्रो रेल्वे योजना वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी आवश्यक सर्वप्रकारच्या एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित यांनी महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांना केली.
यासंदर्भात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन वर्धने यांनी दीक्षित यांना दिले.
दीक्षित यांनी मंगळवारी महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांची भेट घेतली व चर्चा केली. नागपूरच्या विकासात मेट्रो रेल्वेचे महत्त्व अधिक आहे. या योजनेचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. योजनेसाठी विविध एनओसीची गरज भासणार आहे. महापालिकेने यात सहकार्य केले तर काम गतीने करण्यास मदत होईल, याकडे दीक्षित यांनी लक्ष वेधले. २०१५ मध्ये योजनेचे काम सुरू करण्याचे प्रयत्न असून, त्यादृष्टीने महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी योजनेतील महापालिकेचा हिस्सा यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)