पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:40 AM2019-06-08T00:40:12+5:302019-06-08T00:41:49+5:30

पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

Give Pench dam water to the farmers: Morcha on Collector Office | पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next
ठळक मुद्देकिसान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
तुळशीराम कोठेकर, रामू खंडाईत, धनराज वलोकर, मुरली खंडाळा यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामध्ये जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अमोल देशमुख, सदानंद निमकर, राम नेवले, अरुण केदार, माजी सभापती टेकचंद सावरकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या पूर्वी शेतकऱ्यांनी संविधान चौकात धरणे दिले. त्यानंतर संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. समितीतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये चौराई धरणासंदर्भात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारमध्ये झालेल्या करारानुसार पाणी देण्यात यावे. मौजा लोहघोगरी, कन्हान नदी ते तोतलाडोह धरण अंडरग्राऊंड टनेलरूपाने कॅनाल प्रकल्पास वन व इतर सर्व आवश्यक प्रस्तावास मंजुरी देऊन जलद गतीने प्रकल्प पूर्ण करावे. नागपूर शहराची पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय महापालिकेने करावी. कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन मंजूर करून, अटी शर्थी शिथिल कराव्यात. सिंचन व्यवस्थापन न झाल्यास महाराष्ट्र शासन जलसिंचन विभागाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान साहाय्य मंजूर करावे. कन्हान नदीतून बिड, चिचघाट, सिहोरा, बाबदेव, मौदा, उपसा सिंचन प्रकल्प २०१९ च्या खरीप पीकाकरिता पूर्ण करण्यात यावे. शेतीपयोगी रासायनिक खते, कीटकनाशके माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

 

Web Title: Give Pench dam water to the farmers: Morcha on Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.