हिंदीत कामकाजाला प्राधान्य द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:26+5:302021-07-02T04:07:26+5:30

नागपूर : संविधानानुसार केंद्रीय कार्यालयात शासकीय कामकाज हिंदी भाषेत करणे आमचे कर्तव्य असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिंदीत कामकाज करण्यास प्राधान्य ...

Give priority to work in Hindi () | हिंदीत कामकाजाला प्राधान्य द्या ()

हिंदीत कामकाजाला प्राधान्य द्या ()

Next

नागपूर : संविधानानुसार केंद्रीय कार्यालयात शासकीय कामकाज हिंदी भाषेत करणे आमचे कर्तव्य असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिंदीत कामकाज करण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन विभागीय राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष तथा डीआरएम मनिंदर उप्पल यांनी केले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. बैठकीला अप्पर मुख्य राजभाषा अधिकारी तथा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. जगताप, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सुर्यवंशी, सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते. सन २०२० साठी नागपूर विभागाला राजभाषा शिल्ड मिळाल्याबद्दल राजभाषा समितीचे अध्यक्ष मनिंदर उप्पल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीत ३१ मार्चला समाप्त झालेल्या तिन महिन्याच्या कार्यकाळात राजभाषेच्या प्रगतीबाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. गृहमंत्रालयाने राजभाषेच्या प्रचार-प्रसारासाठी २०२१-२२ साठी वार्षिक कार्यक्रम जाहिर केला असून त्यानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आभार राजभाषा अधिकारी गौतम श्रीवास्तव यांनी केले.

.............

Web Title: Give priority to work in Hindi ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.