मोबदला द्या, नाहीतर ‘किडनी विकू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:27 AM2017-10-07T01:27:15+5:302017-10-07T01:27:32+5:30

घर व शेतीचा वाढीव मोबदला आणि शेतकºयांना किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे आंदोलन शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी शिवणगावात केले.

Give a return, otherwise sell 'kidneys' | मोबदला द्या, नाहीतर ‘किडनी विकू’

मोबदला द्या, नाहीतर ‘किडनी विकू’

googlenewsNext
ठळक मुद्देमिहान प्रकल्पग्रस्तांचे सूचक आंदोलन : उत्पन्नाचे स्रोत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घर व शेतीचा वाढीव मोबदला आणि शेतकºयांना किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे आंदोलन शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी शिवणगावात केले. राज्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. सूचक आंदोलनामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडतील आणि आमच्या मागणीकडे लक्ष देतील, अशी माहिती शिवणगावातील मिहान प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
प्रकल्पग्रस्तांचे उत्पन्नाचे स्रोत बंद
डवरे यांनी सांगितले की, नागपूर मनपा हद्दींतर्गत असलेल्या १० हजार लोकसंख्येच्या शिवणगावात १२०० घरे आहेत. मिहान प्रकल्पाच्या घोषणेनंतर येथील शेतकºयांची दुर्दशा झाली. प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी शिवणगावातील शेतकºयांची शेती आणि घरे अल्प मोबदला घेऊन बळजबरीने ताब्यात घेतली आणि धनाढ्य उद्योजकांना जास्त दरात विकली. शेतकºयांना पैसे मिळाले तेव्हा भावाभावांमध्ये वाटणी झाली. हाती मिळालेली खरी रक्कम मुलांचे शिक्षण आणि लग्नात खर्च झाली. घरांची रकमेची अशाच पद्धतीने विभागणी झाली. याशिवाय सरकारने नोकरी न देता एका कुटुंबाला ५ लाख रुपये दिले. तेसुद्धा वाटणीत संपले. पुनर्वसन करताना प्लॉट दिले, पण घर बांधायला पैसे नाहीत. सरकारने शेती व घरांचा ताबा घेतल्यामुळे शेतकºयांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहे. आता तर सर्वच बेरोजगार झाले आहेत. उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सरकारने किडनी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बाबा डवरे यांनी केली.अन्य शेतकºयांप्रमाणे शिवणगावातील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा निर्णय बैठकीत पूर्वीच घेतला आहे.
उद्योजकांना गर्भश्रीमंत करून शेतकºयांना देशोधडीला लावणाºया सरकारच्या विरोधात आमचा लढा निरंतर सुरू राहणार आहे. शेती आणि घराचा वाढीव मोबदला देण्याचे दिलेले आश्वासन सरकार विसरले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवणगाव मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ आहे. त्यांनी प्रकल्पग्रस्तांकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी डवरे यांनी केली.
आंदोलनादरम्यान कुमार खोब्रागडे, रवी गुडधे, संजय डवरे, युवराज फुलझेले, अजय खोंडे, अमोल वानखेडे, गोपाल खोंडे, अरुण महाकाळकर, गोपाल वांगे, चेतन गाणार, पुष्पा गुडधे आणि शिवणगावातील हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
 

Web Title: Give a return, otherwise sell 'kidneys'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.