साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सेवा द्या : अभय बंग यांचे डॉक्टरांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 08:55 PM2019-02-19T20:55:28+5:302019-02-19T20:57:01+5:30

आज आपल्याला जी पदवी बहाल करण्यात आली आहे, तिच्या मागची बाजू कोरी आहे. त्यावर काय लिहायचे ते आपल्या हातात आहे. हातातील अंगठी अंधारात पडली असताना, उजेडात शोधण्याला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे जिथे साधने उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपली सेवा देऊन आपणच व्यवस्थेत अडथळा बनतो. यापेक्षा जिथे साधने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी सेवा दिल्यास समोरच्याला फायदा होतोच, आपल्याला समाधान मिळते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक आणि 'सर्च' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांनी येथे व्यक्त केले.

Give services to non-existent places: Abhay Bang's doctor appealed | साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सेवा द्या : अभय बंग यांचे डॉक्टरांना आवाहन

साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सेवा द्या : अभय बंग यांचे डॉक्टरांना आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देमेयोमध्ये दीक्षांत सोहळा साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज आपल्याला जी पदवी बहाल करण्यात आली आहे, तिच्या मागची बाजू कोरी आहे. त्यावर काय लिहायचे ते आपल्या हातात आहे. हातातील अंगठी अंधारात पडली असताना, उजेडात शोधण्याला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे जिथे साधने उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपली सेवा देऊन आपणच व्यवस्थेत अडथळा बनतो. यापेक्षा जिथे साधने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी सेवा दिल्यास समोरच्याला फायदा होतोच, आपल्याला समाधान मिळते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक आणि 'सर्च' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांनी येथे व्यक्त केले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेयो) दीक्षांत सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. रसिका गडकरी, विभाग प्रमुख डॉ.अशोक जाधव, डॉ. सुनील राऊत, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. कुरेशी, उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
डॉ. बंग म्हणाले, पदवी प्राप्त झाल्यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे. समाजाला काही परत करायचे आहे, या भावनेने डॉक्टरांनी काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. डॉ. केवलिया यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या कर्तृत्वामधून महाविद्यालयाचे नाव मोठे होईलच, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या सोहळ्यात १३० विद्यार्थ्यांना एमबीबीएसची पदवी प्रदान करण्यात आली. संचालन डॉ. अजित बोंदरे व डॉ. सानिया यांनी केले तर आभार डॉ. ऋतुजा मेश्राम व डॉ. स्वाती सिमरन यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. कार्यक्रमाची सुरुवात पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्नस’ महाराष्ट्रचे सहसचिव डॉ. संजय बन्सल, डॉ. ऋतुजा मेश्राम, डॉ. अनूप शिवलानी, डॉ. स्वाती सिमरन, डॉ. सुचिता कुंभारे, डॉ. पल्लवी झामरे, डॉ. गोपाल उभाळ, डॉ. नेहा जेसवानी आदींनी सहकार्य केले.

Web Title: Give services to non-existent places: Abhay Bang's doctor appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.