कर्जमाफीचा लाभ दसºयापूर्वी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:26 AM2017-09-12T00:26:03+5:302017-09-12T00:26:21+5:30
शासनातर्र्फे घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांना दसºयापूर्वी मिळावा, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनातर्र्फे घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांना दसºयापूर्वी मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले.
सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. शिवाय आकड्यांचा खेळ आणि वारंवार बदलणारे निकष यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेनेतर्फे माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हाप्रमुख सतीश हरडे, संदीप इटकेलवार, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, वंदना लोणकर, पांडुरंग बुराडे, नंदा लोहबरे, किशोर पराते, योगेश न्यायखोर, किशोर कुमेरिया, सुनील बॅनर्जी, सूरज गोजे, दिलीप माथनकर, कैलाश कोम्रेल्लीवर, मंगल पांडे, हरीश कढव, प्रवीण बेलसरे, जीवतोडे गुरुजी, पुरुषोत्तम धोटे, नंदू कन्हेरे, गजानन वर्धने, सतीश मुंजे , ऋषिकेश जाधव, विवेक तुरक, राजू भोसकर आदींचा समावेश होता.