टँकरने नाही, नळाने पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:09 AM2021-02-24T04:09:58+5:302021-02-24T04:09:58+5:30
नागपूर : प्रभाग ३४ चिखली ले-आऊट या भागातील १२ ले-आऊटमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेली असूनही या भागात मनपा टँकरने ...
नागपूर : प्रभाग ३४ चिखली ले-आऊट या भागातील १२ ले-आऊटमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेली असूनही या भागात मनपा टँकरने पाणी देत आहे. चक्रपाणीनगर, वैष्णोमातानगर, माँ भगवतीनगर, श्यामनगर, मेहेरबाबानगर, विठ्ठलनगर, सिद्धेश्वरीनगर, गजानननगर, राधाकृष्णनगर, ताजुद्दीननगर, वृंदावन कॉलनी या भागात नासुप्रने पाण्याची पाईपलाईन अर्धवट टाकलेली आहे. ती अमृत योजनेंतर्गत तात्काळ पूर्ण करून नळाने पाणी देण्याची मागणी माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी मनपा आयुक्तांना केली. या भागात दोन पाण्याच्या टाक्या मंजूर असून डबलडेकर पद्धतीने एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करण्याचे व किमान काही नगरात तात्काळ नळाने पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त यांनी दिले. याप्रसंगी डॉ. आशिष आग्रे, मधुकर डेहनकर, चंद्रकांत दाऊस्कर, राकेश डोरलीकर, कैलास लोणारे, कालिदास मिश्रा, राजू मिश्रा, नंदू कळंबे, वैभव जोशी, बाळा मस्कर आदी उपस्थित होते.