पत्नीला सुनावणीची संधी देऊन घटस्फोटावर निर्णय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:10+5:302021-09-02T04:18:10+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात पत्नीला सुनावणीची संधी देऊन घटस्फोट याचिकेवर नव्याने निर्णय द्या, असा ...

Give the wife a chance to be heard and decide on the divorce | पत्नीला सुनावणीची संधी देऊन घटस्फोटावर निर्णय द्या

पत्नीला सुनावणीची संधी देऊन घटस्फोटावर निर्णय द्या

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात पत्नीला सुनावणीची संधी देऊन घटस्फोट याचिकेवर नव्याने निर्णय द्या, असा आदेश कुटुंब न्यायालयाला दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील पत्नी यवतमाळ जिल्हा तर, पती नागपूर येथील रहिवासी आहे. त्यांनी सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, पत्नीने सहमती मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केल्यामुळे कुटुंब न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी तिला सहमतीच्या मोबदल्यात पतीकडून घेतलेले १ लाख १० हजार रुपये, दागिने व इतर वस्तू परत करण्याचा आदेश दिला होता. पत्नीने त्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्फोटाची याचिका मंजूर केली. त्या निर्णयाविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. कुटुंब न्यायालयाने विवादित निर्णय देताना सुनावणीची संधी दिली नाही, असे तिचे म्हणणे होते. तसेच, तिने पतीचे पैसे, दागिने व इतर वस्तू परत करण्याची तयारी दर्शविली. अपीलवरील अंतिम सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, कुटुंब न्यायालयाचा विवादित निर्णय रद्द केला व हे प्रकरण नव्याने निर्णय देण्यासाठी कुटुंब न्यायालयाकडे परत पाठविले.

Web Title: Give the wife a chance to be heard and decide on the divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.