आरोपी साध्वी प्रज्ञाला तिकीट देणे हा कसला राष्ट्रवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:33 AM2019-04-23T00:33:40+5:302019-04-23T00:34:31+5:30
साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिले आहे. भाजपाचा हा कसला राष्ट्रवाद, असा प्रश्न डॉ. मनीषा बांगर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिले आहे. भाजपाचा हा कसला राष्ट्रवाद, असा प्रश्न डॉ. मनीषा बांगर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला आहे. डॉ. बांगर म्हणाल्या, एकीकडे पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्यावर गंभीर प्रकरणे दाखल नसताना त्यांना निवडणूक लढविण्यासापासून थांबविले जाते. परंतु साध्वीला भाजपाने पक्षाचे तिकीट देऊन निवडणुकीसाठी उभे केले आहे. डॉ. बांगर म्हणाल्या, केंद्र सरकारने ‘लॅटरल एन्ट्री’च्या माध्यमातून युपीएसएसीला टाळून संयुक्त सचिवस्तराची १० पदे भरली आहेत. घटनात्मक संस्थेचा अपमान करणारे हे कार्य आहे. पत्रपरिषदेत सुषमा भडे, छाया खोब्रागडे आदी उपस्थित होत्या.