संभाव्य अपघात टाळणाºया कर्मचाºयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:35 AM2017-09-13T01:35:41+5:302017-09-13T01:35:41+5:30
कर्तव्य बजावत असताना समयसूचकता दाखवून रेल्वेच्या कर्मचाºयांनी रेल्वेचे होणारे संभाव्य अपघात टाळल्याबद्दल मध्य रेल्वेच्या नागपूर ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्तव्य बजावत असताना समयसूचकता दाखवून रेल्वेच्या कर्मचाºयांनी रेल्वेचे होणारे संभाव्य अपघात टाळल्याबद्दल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते त्यांना वैयक्तिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अजनी येथील विनोद निखारे यांनी ११ आॅगस्टला तपासणीदरम्यान रेल्वेच्या चाकाचे बेअरिंग नादुरुस्त असल्याचे शोधून काढल्यामुळे दुर्घटना टाळण्यास मदत झाली. दुसºया घटनेत ३ आॅगस्टला चांदूर-नरखेड दरम्यान गेटकिपर रविराज याने रेल्वे रुळाशेजारील गेटला धडक दिल्यामुळे सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेगाडी क्रमांक ५११५१ थांबवून संभाव्य अपघात टाळला. तर ८ आॅगस्टला रामकिशोर कुमरे याने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना त्वरित वरिष्ठ अधिकाºयांना दिल्यामुळे मोठा अपघात टळला. महेश जीवत्या या बैतुलच्या ट्रॅकची देखभाल करणाºया कर्मचाºयाने ट्रॅकची वेल्डिंग निघाल्याची सूचना देऊन अपघात टाळण्यास मदत केली. घोराडोंगरी येथील घटनेत की मॅन रामबाबू मीना यांनी अपलाईनवर ट्रॅकची वेल्डिंग फॅ्रक्चर असल्याचे कळवून अपघात टाळला. २८ आॅगस्टला उमेश भावे या की मॅनने रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली. या कर्मचाºयांना ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.